मुरूम शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा प्रशासन बंदोबस्त केंव्हा करणार?
मुरूम ता.२२, शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम संबंधित कार्यालयाकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. मुरूम शहरातील बसस्थानकात व छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.जि.प. कन्या प्रशाला ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात. या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय, एक महाविद्यालय आहे. तसेच मुरूम शहरात, अक्कलकोट कडे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.
याकडे संबधित प्रशासन लक्ष देईल का?
Leave A Comment