राज्यातील होमगार्डना दिलासा मिळणार का? रामलिंग पुराणे यांचे गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा… दि.०८ जूनला बसव प्रतिष्ठाणच्या ११ मागणी घेऊन व्हीसी मिटिंग..
रामलिंग पुराणे यांचे गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा…
दि.०८ जूनला बसव प्रतिष्ठाणच्या ११ मागणी घेऊन व्हीसी मिटिंग..
मुरूम ता.०५ महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, दि.०५ जानेवारी २०२१ रोजी राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही पुराणे यांनी भेट घेऊन राज्यातील होमगार्ड समस्या निकाली लावण्यासाठी विनंती केली होती.
राज्यातील होमगार्ड समस्याचे विविध ११ मागणीचे निवेदन घेऊन दि.२४ फेब्रुवारी २०२० रोजी रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे दोन दिवसीय आंदोलन ही झाले होते, त्या आंदोलनास राज्यातील वीस ते पंचेविस हजार होमगार्ड उपस्थित होते, दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या भेटीनंतर, आपले मागण्या रास्त असून, अर्थसंकल्पिय अधिवेशना नंतर बैठक लावण्यात येईल असे आस्वासन दिले होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीस विलंब होत राहिला.
दि.२५ मे २०२१ रोजी गृहराज्यमंत्री यांच्या सोबत होमगार्ड समस्या घेऊन व्हीसी मिटिंग आयोजित करण्यात आले होते, परंतु त्या तारखेचीही मिटिंग मंत्रिमंडळाच्या इतर महत्वाच्या कामकाजानिमित्त रद्द झाले होते, आता परत दि. ०८ जून २०२१ वार मंगळवार रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी मिटिंग आयोजित करण्यात आले असून त्या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे व होमगार्डचे मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होणार असल्याचे गृह विभागाचे दि.०४ रोजी श्री. पुराणे यांना पत्र प्राप्त झाले आहे, होमगार्ड समस्यांच्या बसव प्रतिष्ठाणने मांडलेल्या ११ निवेदनावर चर्चा होणार आहे.
प्रमुख मागण्या 1) विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे, 2) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे/किंवा आदींच्या सरकारने देऊ केलेले 180 दिवस काम पूर्वरत करणे 3) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे,
5) तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदनी/पुनर्नियुक्ती पध्द्त बंद करावे, 6) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे,आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे 7) विविध कारणांनी कामावरून काडून टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकाऱ्यांना परत नियुक्ती द्यावे.
8) पोलीस प्रशासनास जी आपत्तीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा. 9) ३० जुलै २००९ च्या शासन निर्णयात बदल करून २ लक्ष रुपये विमा ऐवजी २०२० च्या चालू महागाई नुसार २० लक्ष रुपये करावे व तसेच परिवाराला लघु उद्योग साठी तात्काळ देण्यात येणारे १० हजार रुपये ऐवजी १ लाख रुपये देण्यात यावे व त्यांच्या पाल्याचा शिक्षण खर्चही वाढवून द्यावे. 10) प्रशिक्षण घेऊनही अद्याप त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत, त्यांना पोलीस भरतीत आरक्षण नुसार समाविष्ट करून घ्यावे. 11) केंद्रीय आदेशानुसार महासमादेशक यांनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती रद्द करून नवीन समिती नेमणे बाबत.
स्टेटमेंट ————————————– बसव प्रतिष्ठाणच्या वतीने राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे, कायदे निहाय जाचक अटी लावून गेल्या पाच वर्षांपासून होमगार्डचा छळ केले जात असल्याचे शासनाला वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले आहे, वेळेवर मानधन न देणे, आपत्तीजनक विमा, किंवा आर्थिक मदत न देणे, कोरोना काळात अनेक होमगार्ड कोरोनाने आणि ड्युटी बजावत असताना अपघाताने कुणी शरीर अवयवांनी निकामी झाले आहेत तर कांही मयत झाले आहेत अशा लोकांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे, यासंदर्भात दि.०८ जून रोजीच्या बैठकीत आमच्या मागण्यांवर योग्य निकाल मिळेल अशी अपेक्षा आहे, अन्यथा आम्हाला परत एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावे लागेल.
रामलिंग पुराणे समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
Leave A Comment