ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे जागतिक एड्स दिन साजरा

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे जागतिक एड्स दिन साजरा

मुरूम ता.०१, दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त “आपली एकता आपली समानता एचआयव्ही सह जगणाऱ्याकरिता” या घोषवाक्यास अनुसरून ग्रामीण रुग्णालय मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यजित डुकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आय.सी.टी.सी. विभाग, ग्रामीण रुग्णालय मुरुम व मातोश्री प्यारामेडिकल कॉलेज, मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.रु.मुरुमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बसवराज दानाई यांच्या हस्ते व पोलीस स्टेशन, मुरुमचे सह्ययक पोलिस निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील टीकांबरे, प्रा.आकाश गवई यांच्या उपस्थितीत रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मुरुम शहरातून १०२ रुग्णवाहिकेद्वारे एड्स जनजागृती पर भव्य अशी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रयोगशाळा तंत्रज्ञ गोविंद चव्हाण यांनी एच.आय.व्ही.एड्स बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रा.रु.मुरुमचे समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले यांनी एच.आई.व्ही. आणि तंबाखू विरोधी शपथ दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्ष किरण अधिकारी सचिन तिगाडे व हत्तीरोग पर्यवेक्षक सुरेश भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे एम.पी.डब्ल्यू. गजानन डावरे, सचिन नागटीळक, १०२ चे चालक लखन भोसले, शिवा दुर्गे व इतर अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment