जि.प.सदस्य रफिक तांबोळी यांनी जिल्हा परिषद शाळा येथील पडलेल्या भिंतीची केली पाहणी.
येणेगुर, ता. 15 ऑगस्ट भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिवस . त्या अनूषंगाने जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी यांनी आज सायंकाळी 6:30 वाजता जिल्हा परिषद शाळा येथे जाऊन स्वतःच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वज खाली उतरवून घेतले. सकाळी झेंडावंदन साठी अनेक पुढारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहतात. येणेगुर जिल्हा परिषद सदस्य रफिक भाई तांबोळी यांनी स्वतः सायंकाळी 6:30 वाजता हजर राहून ध्वज खाली उतरावून घेतले तसेच
शाळेतील पडलेल्या भिंतीची पाहणी करून त्या साठी निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले. व सिद्धेश्वर हिप्परगे, यांच्या घराची पडझड पाहून त्यांना लवकरात लवकर घर मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आपू हिप्परगे, संजय गाडेकर ,युनुस शेख गावातील काही तरुण मंडळी उपस्थित होते.
Leave A Comment