About us

0
(0)

आमच्याविषयी

सर्व धर्म समभाव, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून जगतज्योती महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची एक अखिल भारतीय सामाजिक संघटनेची “बसव प्रतिष्ठाण” च्या रूपाने स्थापना केली आहे. ई.स. ११३४-११९६ म्हणजेच १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेऊन जाती पंतीत भेदभाव न करणे,विधवेचा पुनर्विवाह,आंतरजातीय विवाह,अनुभव मंटप सारखा मोटा विचारमंच (संसद) स्थापना करणाऱ्या जगाच्या पहिल्या थोर विचारवंत क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे विचार परत एकदा सामाजिक बांधिलिकी साठी मांडण्याचा प्रयत्न या “बसव प्रतिष्ठाण” मार्फत करण्यात येणार आहे आणि करत आहोत. बाबासाहेबांनी म्हंटल्या प्रमाणे मानवता हे एकच धर्म आहे, स्त्री व पुरुष हे दोनच जात आहेत. हेच संदेश डोळ्यासमोर ठेऊन ही संघटना उभी केली आहे. या संघटनेमार्फत अनेक सामाजिक व धार्मिक कार्य करण्याचा निश्चय केले आहे. या संघटनेत सर्व धर्माच्या जनतेला प्रतिनिधित्व देण्याचा कार्य करणारी ही सामाजिक संघटना राहील. प्रत्येक समाजाला त्यांचे विचार व बाजू मांडण्याचे अधिकार या संघटने कडून राहतील.

लिंगायत समाजासाठी झटणारी व त्याबरोबर इतर समाजाला सोबत घेऊन जाणारी ही पहिलीच संघटना राहील. अर्थात महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी चालणारी ही संघटना राहील. प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले जाईल. जसे सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे पण सर्व बातम्या प्रकाशित केल्या जातात, तसेच महात्मा बसवेश्वर हे आमच्या संघटनेचे मुख्य प्रेरणास्थान आहेत. समाज कार्य करत असताना कोणत्याही समाजाच्या भावनेला ठेच लागू न देण्याची काळजी या संघटने मार्फत घेतली जाईल. आता पर्यंत ही संघटना सामाजिक कार्यात सक्रिय राहून जनसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही आमचे प्रयत्न राहतील, आपण सर्व समाज बांधवाचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच आमच्या पाठीशी रहावे ही सदिच्छा..

श्री. रामलिंग काशिनाथ पुराणे
संस्थापक अध्यक्ष
बसव प्रतिष्ठाण®️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •