पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद, दि.13, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 6.00 वाजता शासकीय मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जि.अहमदनगर येथून उस्मानाबाद कडे प्रयाण. 9.00 ते 9.30 वाजता ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील कोविड सेंटरला भेट. 9.30 वाजता तेरखेडा ता.वाशीकडे प्रयाण. 9.45 ते 10.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, तेरखेडा येथील कोविड केअर सेंटरला भेट. 10.00 वाजता तालुका कळंबकडे प्रयाण. 10.40 ते 11.00 वाजता कळंब येथील आयटीआय कॉलेज हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटरला भेट. 11.00 ते 11.30 वाजता कळंब येथील सोजर मतीमंद हॉस्टेल, कोविड सेंटरला भेट. 11.30 वाजता उस्मानाबादकडे प्रयाण.
दुपारी 12.30 ते 2.00 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व शिंगोली शासकीय विश्रामगृह येथे राखीव. 2.00 वाजता उमरगाकडे प्रयाण. 3.30 ते 4.00 वाजता उपजिल्हा रुग्णालय,उमरगा येथील कोविड सेंटरला भेट.
सायंकाळी 4.00 ते 4.20 वाजता मिनाक्षी मंगल कार्यालय, उमरगा कोविड सेंटरचे उद्घाटन. 4.20 ते 4.40 वाजता गुंजोटी रोड, ईदगाह मैदान, उमरगा येथील कोविड केअर सेंटर व बहुजन हिताय हॉस्टेल येथील कोविड केअर सेटरला भेट. 4.40 वाजता मौजे सास्तूर ता.लोहारा कडे प्रयाण. 5.30 ते 6.00 वाजता मौजे सास्तूर येथे आगमन व स्पर्श ग्रामीण रुग्णालयास भेट. 7.00 वाजता उस्मानाबादकडे प्रयाण.
7.30 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व शिंगोली शासकीय विश्रामगृह येथे राखीव मुक्काम.
शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2020 सकाळी 8.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद कडे प्रयाण. 9.04 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे मा.मंत्री महोदयांचे आगमन व ध्वजस्तंभाकडे प्रयाण. 9.05 ते 9.07 वाजता मा.मंत्री महोदयांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम व राष्ट्रगीत. 9.08 ते 9.12 वाजता मा.मंत्री महोदयांचे हस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण. 9.13 ते 9.20 वाजता मा.मंत्री महोदय यांचे भाषण. सकाळी 9.21 ते 9.25 वाजता मा.मंत्री महोदयांची ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडील तसेच कोरोना योध्दे, कोरोना स्वयंसेवक व आजारातून पूर्णपणे बरे झालेले नागरिकांस भेट व शुभेच्छा. 9.26 ते 10.00 वाजता मा.मंत्री महोदयांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निमंत्रितांसमवेत चहापान व राखीव. 10.00 ते 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते वृक्षारोपन कार्यक्रम. 10.30 वाजता शिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार शासकीय मोटारीने मौ.सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर कडे प्रयाण.
Leave A Comment