अनोळखी वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू मुरूम शहरात शोककळा पसरली मुरुम, ता. उमरगा (प्रतिनिधी) : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जकेकूरवाडी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अनोळखी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. रविवारी (ता. १९) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दोघेही मृत मुरुम (ता. उमरगा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहेत. या
मुरूम शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा.. बैलजोडीचे वाजत गाजत मिरवणूक… मुरूम ता.१४, श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे, बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, दि.१४ वार गुरुवार
भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा संपन्न.. हजारो सदभक्तांची उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा मुरूम ता.१३, येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त दि.१२ रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटाला अग्नी पेठवण्यात आले, सकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन संपन्न झाल्यानंतर पालखी पुरंत आणि सदभक्तांच्या उपस्थित अग्नी प्रवेश झाला. प्रारंभी हनुमान चौकातून पालखी ग्राम प्रदक्षिणा साठी सुरुवात झाले. अतिशय भक्तिमय वतातवरणात पुरंत
महात्मा बसवेश्वरांनी सर्व प्रथम स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिले- मुरुगेंद्र मठ शास्त्री मुरूम येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात बसव पुराणास प्रारंभ मुरूम ता.१७, येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त श्रावणमास मध्ये काशी,उजैन,श्रीशैल पिठाचे संचालक बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी पुराणाचे आयोजन करण्यात येते त्याअनुषंगाने दि.१७ वार गुरुवार रोजी मुरूम येथील हनुमान चौकातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन प्रांगणात श्री बसव पुराण
मुरूम शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा… मुरूम ता.१६, भारतीय ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरूम शहरातील नगर परिषदे वर मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यादरम्यान दरवर्षी देण्यात येणारे अपंग निधीचा प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील विविध राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. शहरातील डॉ.आंबेडकर शहर वाचनालयाच्या वतीने माजी सैनिक रुपचंद
गुणवंत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न मुरूम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी) : येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी (ता. १३) रोजी महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबकराव इंगोले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजीभाऊ फुगटे, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे
कृषी उत्पन्न बाजार समितीवर बापूराव पाटील यांचा वर्चस्व कायम.. विमानाने १५ तर बसने ३ संचालकांचा प्रवासाला सुरुवात मुरूम ता.२९, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ च्या अनुषंगाने दि.२८ एप्रिल वार शुक्रवार रोजी मुरूम येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली, दि.२९ रोजी मुरूम येथील नगर परिषद सभागृहात सकळी ९ वाजल्यापासून मत मोजणी प्रक्रिया पार पडली. मुरून कृषी उत्पन्न बाजार
महादेव कांबळे यांचा प्रामाणिकपणा, दोन तोळ्याचे सोन केलं परत ५ हजार रुपयांचा बक्षीस, मुरूम पोलिसांची यशस्वी कामगिरी…. मुरूम ता.२६, प्रामाणिकपणा हा गुण बोलून दाखवणे खूप सोप्पे आहे परंतु प्रामाणिक राहणे खूप अवघड आहे. प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी एक आंतरिक दृष्टी विकसित करावी लागते. तेव्हा आपण बोलणे, वागणे, नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूत प्रामाणिक राहू शकतो. असाच एक प्रामाणिकपणाच प्रत्यय