औशाचे माजी नगराध्यक्ष ऍड. मुजबोद्दीन पटेल यांचे निधन
बसवराज पाटील यांच्या वतीने शोक संदेश..
मुरूम ता.०४: औसा चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस चे ज्येष्ट नेते अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे आज दुपारी लातुर येथील एका खाजगी दवाख्न्यात उपचारा दरम्यान निधन झाले.मृत्यु वेळी त्यांचे वय 81 वर्षाचे होते.नुकतेच त्यानी कोरोना वर मात केली होती. ऍड.म.मुजीबोद्दीन इस्माइल पटेल यांचा जिवन परिचय- जन्म.03/02/1939 औसा शिक्षण.B.A LLB 1964 पासुन वकीली व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग 1968 पासुन राजकारणात प्रवेश व नंतर नगर परिषद औसा चे नगरसेवक म्हणुन निवड सतत 35 वर्ष नगर सेवक व 17 वर्ष नगराध्यक्ष पदी विराजमान नगराध्यक्षपदाच्या काळात औसा शहराच्या सर्वांगीन विकासात भर, अनेकविध योजनांच्या माध्यमातुन शहरात शाॅपिंग काॅम्पलेक्स, रस्ते, व इतर नागरी सुविधांचे नियोजन, नगर परिषदेच्या वतीने अंत्यविधी अनुदान योजना. शहरातील शांतता व सुव्यवस्था साठी अग्रेसर राहुन औसा शहर शांतता प्रिय शहर म्हणुन नामोल्लेख. फखरोद्दीन अली अहेमद एज्युकेशन सोसायटी औसा च्या माध्यमातुन औसा शहरात उर्दु शिक्षणाची सोय. हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी औसाच्या स्थापनेत सहभागी. महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे लातुर जिल्हा अध्यक्ष म्हणुन सेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राज्य व जिल्हा पदाधिकारी म्हणुन कार्य. जमियते उल्माये मराठवाडा चे उपाध्यक्ष म्हणुन सामाजिक व धार्मिक सेवा शहरातील गरजु व गोरगरिबांना व्याजाच्या मुक्त करण्या साठी “बिनव्याजी पतसंस्थे” ची स्थापना. सर्व राजकिय पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांशी सौहार्दाचे नाते व जनतेशी थेट संबंधा मुळे लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुले, तीन मुली व नातु, पंतु असा मोठा परिवार आहे.
_________________________
माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी बसवराज पाटील यांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला.
_________________________ काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा औसा शहराचे माजी नगराध्यक्ष ऍड. मुजबोद्दीन पटेल यांच्या निधनाची बातमी दुःखद दायक आहे,त्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन काँग्रेस पक्षाची सेवा केली.व औसा शहराच्या विकासातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील,त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष एका अनुभवी नेत्याला मुकला आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
बसवराज पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Leave A Comment