रामलिंग पुराणे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5
(1)

रामलिंग पुराणे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर

मुरूम, ता.१३ (प्रतिनिधी) : बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन २०२० मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष अॅ ड. कृष्णाजी जगदाळे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. रामलिंग पुराणे हे एका सामान्य कुटूंबात मुरूम शहरातील नेहरु नगर भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षीत व्यक्तिमत्वाने बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्नांना घेऊन विशेष करून होमगार्डच्या प्रश्नासाठी मुंबईत जनआंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न असो वा उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहून या रस्त्याकरिता शासन-प्रशासन दरबारी अनेक निवेदने देणे, तो प्रश्न मार्गी लावेपर्यंत सनदशीर, लोकशाही पध्दतीने विविध आंदोलने उभी करणे, त्याचा सततचा पाठपुरावा करणे व ते अनुदान प्राप्त करून त्याची अंमलबजावणी होईल पर्यंत लक्ष देणे. या त्यांच्या कार्य कुशलतेमुळेच त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर ओळखले जाते. सध्या बसव प्रतिष्ठान न्यूजच्या माध्यमातून त्यांनी या परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची बातमी कळताच विविध सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार मित्र, ग्रामस्थ, मित्र परिवारांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment