October 16, 2020
By Admin Basav Pratishthan
मुरूम मंडळात अतिवृष्टी केसरजवळगा,बेळंब शिवारातील शेतकरी बांधवांची भेट घेऊन तात्काळ पंचनामे करा-शरण पाटील
मुरूम ग्रामिण ता.१६,परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांचा हाताला तोंडाला आलेला घास हिरावल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबिन पिक काढून ठेवली तर शेतात मळणीसाठी ढिग शिवारात झाकून ठेवली पण माञ शेतक-यांचे सोयाबीन उभ्या पिकात पाणी असून ढिगा-या खाली पाणी गेल्याने भिजून नुकसान झाले ऊसाचे फड ही जमीन दोस्त झाले तसेच जोरदार पावसाने बहूतांश ठिकाणी वाहून गेले तर शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाले तात्काळ पिकांचे पंचनामे युध्द पातळीवर करून शेतकरी बांधवांना आधार दयावा अशा प्रशासनास सूचना शरण बसवराज पाटील यांनी दिल्या…
मुरूम मंडळातील परतीच्या पावसाने झालेल्या सोयाबीन,ऊस पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी उमरगा तालुक्यातील पाच ही मंडळात अतिवृष्टीमुळे नोंद झाली आहे.
शेतकरी बांधवांचे आतोनात हाल झाले आहेत काही ठिकाणी पूल वाहून गेलेत तर काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली पुराच्या पाण्यात जनावरे 62 हून अधिक जनावरे वाहून गेली 15 दिवसावर आलेल्या रब्बीची पेरणी आल्याने शेतकरी सध्या चिंताग्रस्त अस्मानी सुलतानी संकटाना सामोरे जावे लागत आहे तरी शासनाने नुकसानभरपाई लवकर दयावी असे यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा उसमानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यावेळी बोलत होते.
बेळंब,केसरजवळगा शिवारातील पहाणी दरम्यान उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील,गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे,मा.पंचायत समिती सदस्य उल्हास घुरघुरे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी,केसरजवळगा सरपंच गोविंद पाटील बेळंब सरपंच महानंद कलशेट्टी राजू मुल्ला यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Post Views:
1,027
Related Post
Leave A Comment