October 20, 2020
By Admin Basav Pratishthan
अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर
मुंबई, दि. २० : – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील.
मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम असा :
सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण. स.१०.२० वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. १०.५० वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा-कात्री (ता. तुळजापूर)कडे प्रयाण. स. ११.३० वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी. दुपारी १२.०० वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १.००वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप.
दु. १.४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व दु. ३.३०वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
Post Views:
521
Related Post
Leave A Comment