October 28, 2020
By Admin Basav Pratishthan
दिपावली सणानिमीत्त तात्पुरते
फटाके विक्री परवानगी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमीत्त् तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगी साठीचे अर्ज दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 ते 07 नोव्हेंबर 2020 या कालावधीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत करावेत.
या परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, फॉर्म साक्षांकित नकाशा, संबधित ग्रामपंचायत / नगर परिषदचे नगर पंचायतचे नाहारकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा, संबधित जागा खाजगी असेल तर जागामालकाचे नाहारकत व जागेचे कागदपत्र, संबधित पोलीस स्टेशनचे नाहारकत प्रमाणपत्र व विहित परवाना फीस भरणा केल्याचे चलन सादर करावे.
परिपुर्ण असलेले प्रस्ताव या कार्यालयास स्विकारले जातील. विहित दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे अपरजिल्हाधिकारी , उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Post Views:
468
Related Post
Leave A Comment