December 6, 2020
By Admin Basav Pratishthan
राष्ट्रीय स्तरावरील गरुडझेप पुरस्काराने माजी सैनिक खंडू दूधभाते सन्मानित
उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : ईगल फाउंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्काराचे वितरण नुकतेच गणपतीपुळे, जि.रत्नागिरी येथे उत्साहात पार पडले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुंजोटी येथील माजी सैनिक खंडू दूधभाते यांना गरुडझेप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते खंडू दूधभाते यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा नलावडे, ज्येष्ठ विधिज्ञ राजशेखर मलुष्टे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी, जिल्हा सचिव किरण काळे, आटपाडीच्या पंचायत समिती सभापती सौ.भूमिका बेरगळ, वैभव पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.राजू शेंडगे, डॉ.सचिन शेंडगे, प्रा.डॉ. महेश मोटे, ईगल फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रकाश वांजळे, दीपक पोतदार, शालन कोळेकर आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
Post Views:
463
Related Post
Leave A Comment