September 22, 2020
By Admin Basav Pratishthan
स्वतःच्या व आपल्या लहान मुलीच्या तोंडाला काळे फासून अनोखे आंदोलन,लोहारा नगर पंचायतचे गलतन कारभार चव्हाट्यावर..!
लोहारा ता.२२ इतर वॉर्डातील बोअरचे पाणी घराच्या परिसरात येत असल्याने त्यामुळे घराच्या बांधकामाचे नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून नगर पंचायतचे चकरा मारून तक्रार निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे दि.२२ रोजी लोहारा येथील त्रस्त नागरिक उमाकांत लांडगे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबून आपल्या लहान मुलीसह नगर पंचायत समोर स्वतःच्या व मुलीच्या तोंडाला काळे फासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दि.२२ रोजी चालू असलेल्या या लाक्षणिक उपोषणाचा कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती उमाकांत लांडगे यांनी बसव प्रतिष्ठाण न्युज ला फोनवर बोलताना सांगितले, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असल्याने संध्याकाळी ५ वाजता उपोषण संपवल्यात आले असून यापुढेही जर प्रशासनाने दखल न घेतल्यास परत आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावरून स्पस्ट होते की नगर पंचायत झोपा काढत आहे की झोप्याचे सोंग घेत आहे, नागरिकांच्या तक्रारीना केराची टोपली दाखवून त्रस्त नागरिकांना न्याय देण्याऐवजी चकरा मारायला लावायचे नगर पंचायतचे कारस्थान चव्हाट्यावर आले आहे, सदरील संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार का? आणि त्रस्त नागरिक उमाकांत लांडगे यांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views:
494
Related Post
Leave A Comment