पान टपरी दुकाने चालू करण्यासाठी परवानगी द्या, नाहीतर कुटुंब चालवण्यासाठी मानधन द्या…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरूम टपरी धारकांनी मुरूम नगर परिषद मार्फत दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

मुरूम टपरी धारकांनी मुरूम नगर परिषद मार्फत दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

मुरूम ता.०२ कोरोनाच्या आपत्तीत मुरूम शहरातील जवळपास 150 ते 200 टपरी धारकांचे दुकाने गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने टपरी चालू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अन्यथा कुटुंब चालवण्यासाठी मानधन तरी द्यावे ही मागणी करत दि.०२ रोजी मुरूम शहरातील टपरी व्यवसायकांनी नगर परिषद मार्फत उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठवले.आमचा व्यवसाय बंद असून आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. सर्व परिवार कर्जाच्या बोजाखाली गेले आहेत. आपल्या शासनाच्या नियमांमध्ये जवळपास सर्वच आस्थापना व व्यवसाय चालू करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे इतर सर्वत्र तंबाकुजन्य पदार्थ सर्रासपणे मिळत आहेत, तरी मा.साहेबांनी सद्य परिस्थितध्ये सर्व टपरीधारक आमच्या परिवाराचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या टपरीबाबत काही नियम शिथिल करून नियमावली बनवून आमची दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अन्यथा सर्व बांधवाना कुटुंब चालविण्यासाठी सरकार तर्फे मानधन देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मुरूम नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment