लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंढे यांची जयंती उमरगा तालुक्यात विविध ठिकाणी साजरी..
उमरगा ता.१९, तालुक्यातील मुळज,कुन्हाळी,गुंजोटी,भुसनी व मुरुम शिवारातील उसाच्या फडात ऊसतोड कामगार संघटना पदाधिकारी यांच्या समवेत ऊसतोड कामगारांनी साजरी केली. स्व.गोपीनाथजी मुंढे यांची जयंती निमित्त माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या सुचनेनुसार उमरगा तालुक्यातील मुळज,कुन्हाळी,गुंजोटी,भुसनी व मुरुम शिवारातील उसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारां सोबत साजरी केली.यावेळी राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न,
ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, ऊसतोड कामगार, पशु, वाहने, आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थ सहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना, यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी गोपीनाथरावजी मुंढे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके,जि प बांधकाम माजी सभापती ऍड अभय चालुक्य, भाजपाचे नेते सुनील कुलकर्णी , गोपीनाथ मुुंडे साहेब प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुनील सानप, युवराज जाधव, साहेब प्रतिष्ठानचे सरचिटणीस शुभम मुळजकर,वंजारी सेवसंघाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधवर,भाजपचे पंडीत शिंदे ,दीलीप इंगोले,झाकीर जमादार ,ब्याळेमामा,सिद्राम सोनटक्के ,शरणप्पा मुळे , उमेश कारडामे ,सुरज आबाचने, प्रथ्वीराज जाधव व भाऊसाहेब कोरनाळे यांच्या सह मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार उपस्थित होते.
Leave A Comment