मुरूम शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जागरण-गोंधळ आंदोलन आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरूम शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जागरण-गोंधळ आंदोलन

मुरूम ता.२२ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मागणी करत जागरण-गोंधळ घालून राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणला न्यायालयाकडून स्थगित मिळाल्याने राज्यभर मराठा समाज आक्रमक पवित्रा घेतला आहे, याच समाजाने या आदी ही मराठा क्रांती मोर्चा अगदी शांततेत पार पाडून एक इतिहास रचला आहे, परंतु लागू झालेल्या मराठा आरक्षणाला कोर्टाकडून स्थगिती मिळाल्याने परत राज्यभरात मराठा आरक्षण पेटले असून त्याचे पडसाद आज मुरूम शहरातही दिसून आले.मुरूम शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणे बाजी करत आठ दिवसात कोर्टाची स्थगिती हटवा अन्यथा संपूर्ण उमरगा तालुक्यातील एकही शासकीय कार्यालय चालू देणार नसल्याचेही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला आवाहन केले आहे.तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जागरण गोंधळाने आंदोलनास सुरुवात केली, यात मराठा समाजातील व इतर समाजातील युवकांनी यावेळी आपले मत मांडले.१)आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करू नये.२)आरक्षणावरील स्थगिती उठलीच पाहिजे.३)मराठा मुलींसाठी वस्तीगृह झालेच पाहिजे.४)आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.५)एकच मिशन, मराठा आरक्षण.६) एक मराठा, लाख मराठा.७)या नेत्यांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय.८)केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध.अशा घोषणा ही यावेळी करण्यात आले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment