October 13, 2020
By Admin Basav Pratishthan
बंद असलेली धार्मिक स्थळे तात्काळ उघडण्यात यावीत — भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील
लोहारा/प्रतिनिधी
राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद या महाविकास आघाडी सरकारच्या या काळ्या निर्णयाविरुद्ध भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने दि. 13 ऑक्टोंबर 2020 रोजी शहरातील हिप्परगा रोड लगत असलेल्या जगदंबा मंदिरासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करून या नाकर्त्या राज्य सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व तसेच लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील जगदंबा मंदिरासमोरही राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने दारूची दुकाने बिअर बार, रेस्टॉरंट, इत्यादी सुविधा चालू केली आहेत. परंतु नागरिकांच्या व राज्यातील कोट्यावधी भाविक भक्तांचा अत्यंत श्रद्धेचा विषय असणारे मंदिर, मज्जित, गुरुद्वार, चर्च, यासह आदी धार्मिक स्थळे कुलुफ बंदच आहेत. सध्या कोरोना आजाराची तीव्रता कमी झाल्याने व सुरक्षित अंतरांचे नियम घालून बियर बार, हॉटेल, धाबे, प्राधान्याने सुरू केली आहेत. तर इतर राज्यांमध्ये मंदिरे प्रार्थनास्थळे चालू आहेत. केवळ महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक भक्तगण व नागरिकांतून तीव्र नाराजी पसरली आहे. मंदिरे बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील जनतेची श्रद्धा स्थाने मंदिरे अजूनही बंद ठेवली आहेत. यामुळे मंदिरावर उपजीविका असणारे पुजारी, साधुसंत, पुरोहित, फुल, प्रसाद विक्रेते यांच्यासह अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी कोट्यावधी भाविक भक्तांच्या श्रद्धेचा प्रश्न असलेल्या मंदिर मज्जिद व इतर आवश्यक प्रार्थनास्थळे सुरू करण्यात यावीत, यासाठी लोहारा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून आता तरी या राज्य सरकारने तात्काळ धार्मिक स्थळे उघडावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजित ढोणे, भाजप मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पवन मोरे, जि.का. सदस्य कमलाकर शिरसाट, प्रशांत काळे, उदय कुलकर्णी, दिलीप पुजारी, सिद्धेश्वर बिडवे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, सागर गिरी, अंकुश बंडगर, प्रतिक गिरी, गौरव गोसावी, शिवानंद जट्टे, बालाजी कदम, सुधाकर जाधव, प्रशांत माळवदकर, योगेश बाबळे, सचिन कोळी, उमेश टेकाळे, महेश बाबळे, विकी थोरात, लहू नारायणकर, रमेश जाधव, सुरज पवार, शुभम माळी, शुभम गोसावी, रशीद जमादार, अजय गोसावी, गोविंद यादव, वीरेंद्र पवार, संभाजी पवार, पप्पू पवार, रमेश भुरे, गंगाधर पवार, उमेश इगवे, महेश पोतदार, महेश इगवे, संजय पवार, किरण माळी, सोनू पाटील, महेश पवार,बळी माळी, नेताजी सुरवसे, महेश माळी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
393
Related Post
Leave A Comment