नगराध्यक्ष बापुराव पाटील यांचा पदभार सोहळा थाटात..

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

नगराध्यक्ष बापुराव पाटील यांचा पदभार सोहळा थाटात..

उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड...

मुरूम ता. ०९, २१ डिसेंबरला मुरूम नगर परिषद निवडणूक निकाल लागला आणि नगराध्यक्ष पदी बापुराव पाटील तर १९ नगरसेवक प्रचंड बहूमतानी विजयी झाले. दि. ०९ वार शुक्रवार रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार सोहळा थाटात संपन्न झाला. प्रारंभी बापुराव पाटील, शरण पाटील यांनी चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका, माता गंगाबाई पाटील यांच्या समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून, ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. मुरूम येथील महात्मा बसवेश्वर चौकातुन पदयात्रेला सुरुवात झाली याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, म्हलार पाटील, नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिभा निकेतन शाळेच्या प्रांगणात स्वागतासाठी सडा रांगोळी टाकण्यात आली होती, विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तर प्राचार्य उल्हास घुरघुरे, विवेकानंद परसाळगे, राधाकृष्ण कोंढारे, बसवराज पाटील आदिनी बापुराव पाटील, शरण पाटील,उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. नगर परिषद प्रांगण मंडपाने, तर सभागृह फुलांनी सजविण्यात आली होती. मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदभार सोहळा थाटात संपन्न झाला.
मुरूम पालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ९) रोजी पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुरूम पालिकेत भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी बापुराव पाटील हे विजयी झाले आहेत. उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (ता. ९) रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालिकेच्या उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी रमेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी रमेश चव्हाण यांची उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी सूर्यकांत जाधव व श्रीराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, नितीन काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवानेते शरण पाटील, माजी सभापती मदन पाटील, उमरगा जनता बँकेचे संचालक रफिक तांबोळी, योगेश राठोड, दत्ता चटगे, गटनेते गणेश अंबर आदिसह मान्यवर,पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक गौस शेख, रुपचंद गायकवाड, अमर भोसगे, राजेंद्र बेंडकाळे, अजित चौधरी, गणेश अंबर, मणियार, सिद्राय्या ख्याडे, सचिन फनेपुरे, नगरसेविका श्रीदेवी दुर्गे, अंकिता अंबूसे, मुमताजबी ढोबळे, निर्मला कंटेकुरे, रागिणी गायकवाड,सुनीता बन्ने,महादेवी बनसोडे,ज्योती शेळके,समीना मुल्ला,स्नेहा बंडगर आदींचा येतोचिथ सत्कार सोहळा पार पडला. बापुराव पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटनेच्या वतीने, मुरूम येथील नागरिकांनी सत्कारासाठी गर्दी केली होती. उपनगराध्यक्ष पदी रमेश चव्हाण यांच्या निवडीबद्दल महात्मा बसवेश्वर चौकापासुन वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment