बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सत्कार व निरोप समारंभ संपन्न…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सत्कार व निरोप समारंभ संपन्न…

अहमदपूर, ता.०८, साने गुरुजी विद्यालय येस्तार या विद्यालयातील मुख्याध्यापक बाळुरे बसवराज बाबशेट्टी हे २७ वर्षे सेवा देऊन सेवामुक्त झाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शंकरराव कदम, केंद्रीय मुख्याध्यापक ढाळेगाव . व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नारायण कांबळे, अध्यक्ष: महाराष्ट्र समाजशास्त्र परिषद हे उपस्थित होते.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. येस्तार गावाचे सरपंच महेश ढाकणे यांच्या हस्ते बाळूरे बसवराज सरांचा सत्कार सपत्नीक करण्यात आला. बसवराज बाळूरे शाळेत येण्यापूर्वी रमामाता आंबेडकर अध्यापिका विद्यालय औराद शहाजनी येथे प्राचार्य पदावर ७ वर्ष सेवा दिली होती. त्यांच्या कार्य काळात जवळपास ३०० शिक्षिका घडल्या.
ते गणित या विषयाचे अध्यापन करायचे यामुळे साने गुरुजी विद्यालय या शाळेचा निकाल ५ ते ६ वर्षे सतत १००% लागला होता. ते एक विद्यार्थी प्रिय व पालकांचे आवडते शिक्षक होते. त्यांनी आपल्या या कार्यकाळात विविध उपक्रम राबविले.
त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, माजी विद्यार्थी , अहमदपूर गणित मंडळाचे गणित मित्र ,येस्तार, टाकळगाव, शेनकुड, वंजारवाडी या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून बाळुरे यांचा सत्कार केला व पुढील भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी बसवराज बाळूरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संस्था सचिव डी. बी. लोहारे व गावकरी यांचे मनापासून आभार मानले.या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ. वाडीकर वनिता यांनी केले व आभार प्रदर्शन तुकाराम दत्ता यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मठपती विवेकानंद ,जाधव सुनील, बिरादार सर , किडे सर , पांडे सर, सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment