समाजसेवक रामलिंग पुराणे घेणार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट…
राज्यातील होमगार्ड समस्याबाबत चर्चेसाठी मागितली होती वेळ…
मुरूम ता.१८, महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या बाबत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगत सिंह कोश्यारी यांचेकडे दि.१५ डिसेंबर रोजी भेटीसाठी ई मेल द्वारे पत्र पाठवून वेळ मागितले होते, तात्काळ त्या पत्रास खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांनी प्रतिउत्तर देत, सविस्तर विषयाचे निवेदन पाठवण्यास सांगितले होते त्यानुसार समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी सविस्तर निवेदनात महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या व त्यांच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्या संदर्भात प्रतिउत्तर देऊन कळवले होते. त्या पत्राची दखल घेऊन मा.राज्यपाल यांनी दि. रोजी समाजसेवक रामलिंग पुराणे यांना भेटीचे वेळ दिले असल्याचे खाजगी सचिव मुणगेकर यांनी श्री पुराणे यांना सांगितले.
काय आहे निवेदन
आपल्याभेटी साठी सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड गेले अनेक वर्षा पासून अनेक समस्यांनी ग्रासले आहेत, याबाबत महाराष्ट्र शासनाला जानेवारी २०२० पासून आम्ही विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहोत, दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन ही झाले, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब यांच्या भेटीनंतर व मागण्या रास्त असून मान्य करायला हरकत नाही,अर्थसंकल्प अधिवेशन नंतर बैठक लावन्याच्या आश्वसनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, त्यानंतर कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व काही बंद होते, पण आता सर्व काही चालू झाले असले तरी अद्याप होमगार्ड मागण्या प्रलंबित आहेत याबाबत मा. राष्ट्रपती साहेब, केंद्रीय गृहमंत्री यांना ही कळवण्यात आले होते त्यांनीही होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी त्री सदसिय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत, परंतु शासन यावर गांभीर्याने दखल घेत नाहीत, संबधित महासमादेशक कार्यालयातूनही होमगार्डचे समस्या सोडवण्या ऐवजी समस्या वाढवत आहेत आदींच्या भाजपा सरकारने १८० ते २०० दिवस काम देऊ केले होते, पण आताच्या शासनातील वित्त विभागाने शासनाचे चिजोरीचे आर्थिक भार कमी करण्यासाठी होमगार्डना वर्षभरात फक्त ५० ते ५२ दिवस काम देण्याचे आदेश काढले आहेत,यासह दहा मागण्याची या पत्रात नोंद असून व त्याच बरोबर, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत त्यामुळे कोणत्याही आमदार किंवा खासदार यांचे शिफारस पत्र सोबत जोडले नाही असेही त्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
——————————————————————-
सरकारकडे डोके फोडून फोडून राज्यातील होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा निवेदने दिले, बैठकी साठी तारीख मागण्यात आले पण अद्याप सरकार दखल घेयाला तयार नाही, सरकारला गोर-गरीब नागिकांचे उपासमारी वर चर्चा करायला वेळ नसल्याचे स्पष्ट दिसते त्यामुळेच आम्ही राज्याचा महामहिम राज्यपाल यांचेकडे भेटीचे वेळ मागितली होते त्यानुसार त्यांनी भेटीचे वेळ दिली असून आता राज्याच्या होमगार्डच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून होमगार्डना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.
रामलिंग पुराणे
समाजसेवक
Leave A Comment