सकाळ यिन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

सकाळ यिन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार

मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) : कृषिदिन व राष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सकाळ माध्यम समूहाचे यंग इस्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या विशेष योगदानाबद्ल सत्कार करण्यात आला.

यावेळी मास्क, सॅनिटायझरचे वाटप गुरुवारी (ता.१) रोजी मुरूम पोलीस ठाण्यात जावून करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, पोलीस उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम सोनटक्के, पोलीस हवालदार संजय नायकल, संदीप कोळी, पोलीस नाईक अमर महानुरे, अफरीन मुजावर, ज्योती पंढरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात जावून सेवानिवृत्तीबद्ल वैद्यकीय अधिक्षक डॉ.वसंत बाबरे, त्यांच्या पत्नी डॉ.अनिता बाबरे, डॉ.आरती बाबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे, डॉ.विनोद सरवदे, डॉ.गुंडाजी कांबळे, हिरवे, आकाश जाधव आदींचा सत्कार यीन सकाळचे जिल्हाध्यक्ष मनोज हावळे, सदस्य योगेश पांचाळ, शितल पातळे, शुभांगी कुलकर्णी, अंबिका पातळे, पुजा शिंदे आदींनी पुढाकार घेऊन केला. यीनचे समन्वयक प्रा.डॉ.महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.रवी आळंगे, प्रा.डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.संध्या डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. यावेळी पोलीस व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment