पर्यावरण दिनानिमित्त माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्ष लागवड

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

पर्यावरण दिनानिमित्त माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्ष लागवड

मुरूम, ता.५ (बातमीदार) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता.५) रोजी महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.रवि आळंगे, डॉ.संध्या डांगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.विलास खडके आदिंची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ.रवी आळंगे म्हणाले, की वृक्ष संवर्धन, संगोपन आणि संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी अनेकांचे प्राण गेले. निसर्गाकडून ऑक्सिजन निर्माण होण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एक वृक्ष तरी लावलाच पाहिजे. या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आनंदनगर हे गाव दत्तक घेऊन प्रत्येक घरी एक झाड लावण्याचा संकल्प निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना नियमाचे पालन करून प्रा.लक्ष्मण पवार, प्रा.भूषण पाताळे, प्रा.दयानंद राठोड, लालअहमद जेवळे, व्यंकट मंडले, यिनचे जिल्हाध्यक्ष मनोज हावळे, योगेश पांचाळ, पुजा ब्याळे, अमोल कटके आदिंनी पुढाकार घेतला.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment