मुरूम शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
मुरूम ता.१६, भारतीय ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरूम शहरातील नगर परिषदे वर मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यादरम्यान दरवर्षी देण्यात येणारे अपंग निधीचा प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील विविध राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील डॉ.आंबेडकर शहर वाचनालयाच्या वतीने माजी सैनिक रुपचंद गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळाचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद स्पेशल शाळेचे विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिभा निकेतन विद्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव व्यंकट जाधव,श्रीकांत बेंडकाळे,शिवाजी चेंडके,प्रमोद कुलकर्णी, सुधीर चव्हाण,देवराज संगुळगे, उत्कर्ष गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य सौ.महानंदा रोडगे, उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, क्रीडा शिक्षक सुजित शेळके,प्रसन्नकुमार बिराजदार, नारायण सोलनकर, चंद्रमप्पा कंटे, राधाकृष्ण कोंडारे, संतोष बिंदगे,ज्ञानेश्वर माळी, कस्तुरी जाधव,शाहीन तांबोळी,मनीषा कंटेकुरे,स्मिता सपाटे,संतोषकुमार सुर्यवंशी, सुरेश कांबळे,बालाजी बिदे,शिवानंद पाटील आदींनी परिश्रम घेतले.
गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश शाळेत प्रतिभा निकेतन माजी मुख्यध्यापक दत्ता शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विठ्ठल पाटील, व्यंकट चौधरी,देविदास व्हनाळे, विनोद पोतदार,सुहास पोतदार,सचिव आनंद चौधरी, मुख्यध्यापिका मयुरी चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
नूतन प्राथमिक शाळेत ध्वजारोहण भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नूतन प्राथमिक शाळा मुरूम येथे शाळेचे मुख्याध्यापक वडगावे एस जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
मुरूम बस स्थानकात वाहतूक नियंत्रक ए एस राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुरूम पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक एम जी शेंडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे विश्वस्त शरण बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माधवराव पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते . त्यानंतर इंग्लिश स्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र दिनाविषयी विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत व विविध कलाविष्कार सादर केले.
Leave A Comment