जिवनात यशस्वी होताना समाजाभिमुख जिवन जगावे….. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक मा. विठ्ठल जाधव
उमरगा : लक्ष्मण पवार
जिवनात यशस्वी होताना समाजाभिमुख जिवन जगावे असे प्रतिपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी केले.
ते प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार सोहळा, २०२० तसेच ‘मी वाचलेली उमरयातील माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे सकाळी १२:३० वाजता संपन्न झाला यावेळी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भुमीपुञ वाघ, आशुतोष महाराज, शिवसेनेचे केशव उर्फ बाबा पाटील, शाहूराज माने, संदिप चौगुले, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, असिफ मुल्ला, टोपे, अशोक सरवदे, रमेश माने, भास्कर वैराळे, बाबा जाफरी, राम गायकवाड, प्रदिप जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी साहित्यरत्न पुरस्कार शिवमुर्ती भांडेकर, समाजरत्न पुरस्कार कॉ. किसन कटके, उदयोगरत्न पुरस्कार नागनाथ कुंभार, पञकाररत्न पुरस्कार अंबादास जाधव, शिक्षकरत्न पुरस्कार कवी बालाजी इंगळे, कृषीरत्न पुरस्कार वैशालीताई आष्टे, क्रिडारत्न पुरस्कार महंमदरफी शेख या सात जनांना सन्मानपुर्वक पुरस्कार देण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रविण स्वामी सर यांनी केले. प्रास्ताविक अँड. शितल चव्हाण यांनी तर आभार प्राचार्य युसूफ मुल्ला यांनी मानले.
Leave A Comment