पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात उमरगा काँग्रेस कमिटीचे वतीने आंदोलन..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात उमरगा काँग्रेस कमिटीचे वतीने आंदोलन..

उमरगा ता.०७, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढी विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा येथे आंदोलनकरण्यात आले

मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये म्हणजे 258% वाढ. डिझेलवरील एक्साईज ड्युटी 3.56 रुपये होती ती 31.80 रुपयांवर गेली आहे म्हणजे 820% वाढ.

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे.

या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये तो १८ रु. प्रतिलिटर केला.

केंद्रात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंहजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. हे अंदोलन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटाचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव,युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे,उमरगा तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे,नअल्पसंख्याकचे अध्यक्ष याकूब लादाफ,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार,अतिक मुन्शी,विजय दळगडे,पप्पू सगर, नगरसेवक महेश मशाळकर,विक्रम मस्के,दत्ता चिंचोळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, परमेश्वर टोपगे, अभिमन्यु भोसले, डींगबर औरादे, बाबा मस्के, सोहेल इनामदार,,व्यंकट पवार,जीवन सरपे,चदु मजगे,आदी उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment