April 29, 2023
By Admin Basav Pratishthan
कृषी उत्पन्न बाजार समितीवर बापूराव पाटील यांचा वर्चस्व कायम..
विमानाने १५ तर बसने ३ संचालकांचा प्रवासाला सुरुवात
मुरूम ता.२९, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ च्या अनुषंगाने दि.२८ एप्रिल वार शुक्रवार रोजी मुरूम येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली, दि.२९ रोजी मुरूम येथील नगर परिषद सभागृहात सकळी ९ वाजल्यापासून मत मोजणी प्रक्रिया पार पडली. मुरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपन्न झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास आघाडी पॅनेलने पॅनल प्रमुख बापूराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ जागेवर विजयी शिक्का मोर्तब झाले तर महायुती पुरस्कृत मार्केट कमिटी विकास पॅनल ला ३ जागेवर समाधान मानावे लागले. मतदारांनी १५ संचालकांना विमानाने हवाई उड्डाणाला पसंती दिली तर बस मात्र ३ संचालकांना घेऊन प्रवासास सुरुवात केली आहे. सोसायटीच्या सर्वसाधारण उमेदवार ७,महिला राखीव २,इतर मागास १, भटक्या विमुक्त जाती १, ग्रामपंचायत सर्वसाधारण १, आर्थिक दुर्बल १, अनुसूचित जाती जमाती १ बिनविरोध, व्यापारी १ असे एकूण १५ जागेवर विमानांनी उड्डाण घेतले तर ग्रामपंचायत सर्वसाधारण १, व्यापारी १, हमाल तोलार १ असे तीन जागेवर महायुतीचा बस ने प्रवास सुरु झाले आहे. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती वर पुन्हा एकदा पाटील यांचा वर्चस्व कायम जरी राहिले असले तरी २०२३ चे निवडणूक मात्र चुरशीची झाले आहे. हमाल मापाडी या सर्वसामान्य मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारत महायुतीला ३२ मतदान तर महाविकास आघाडीला १० मत मिळाले आहेत यावर दुर्लक्ष न करता, चिंतन करणे गरजेचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डी जी मोरे यांनी निवडणूक शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासन, निवडणूक कर्मचारी,पत्रकार बांधवाचे मानले आभार. निकालानंतर मुरूम शहरात बापूराव पाटील समर्थकात जल्लोषाचे वातवरण होते.
विजयी उमेदवार
सहकारी संस्था- बापूराव पाटील,बसवराज कारभारी,बसवराज पाटील,गोविंद पाटील,सुधाकर पाटील,नेताजी कवठे,बसवराज वरनाळे (सर्व महाविकास आघाडी),व्यापारी मतदार संघ- मंगरुळे धनराज (महाविकास), मंगरुळे सुरेश (महायुती),हमाल मापाडी मतदार संघ- दूधभाते शिवाजी (महायुती),आर्थिकदृष्ट्या दुर्बल- महालिंग बाबशेट्टी महाविकास) ,भटक्या विमुक्त जाती- सोनकटाळे विजयानंद (महाविकास) , ग्रामपंचायत सर्वसाधारण- सोमनाथ पाटील (महायुती) ,दौलप्पा तोरकडे (महाविकास),इतर मागास- पंकज स्वामी (महाविकास), महिला राखीव- सुचिता जाधव,मंगलबाई लामजाणे (महाविकास),ग्रामपंचायत अनुसूचित जाती भालचंद्र लोखंडे बिनविरोध (महाविकास)
Post Views:
1,344
Related Post
Leave A Comment