श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीप हंगामाचा मोळी पुजन सोहळा संपन्न मुरुम, ता.१९ (प्रतिनिधी) : येथील श्री विठ्ठलसाई सरकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम नुकताच संपला झाला असून आज सोमवार (ता.१९) रोजी यंदाच्या गळीप हंगामाच्या मोळी पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यंदाच्या हंगामात ५ लाख मेंट्रीक टन ऊस
राज्याचे मंत्री देशमुख,बनसोडे यांच्यासह खा.शरद पवार यांनी नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी संबधितांना पंचनामे करण्याचे दिले निर्देश उस्मानाबाद दि. १८ (जिमाका) – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत
ऍड राजासाहेब पाटील यांची किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड मुरूम ता.१८, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते ऍड राजसाहेब पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष(मराठवाडा विभाग) पदी निवड करण्यात आली आहे. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश अध्यक्ष ऍड माधव जाधव यांनी त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले आहे ऍड
अतिवृष्टीमुळे आपत्तीत सापडलेल्या 126 लोकांचे जीव वाचवणाऱ्या एसडीआरएफ जवानांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार उस्मानाबाद/तुळजापूर, दि.16(जिमाका):- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी उस्मानाबाद जिल्ह्यात झाली. त्यामुळे लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पातून पाणी नदी-नाले यात सोडण्यात आले. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. या पुरामुळे लोहारा, उमरगा व परांडा तालुक्यातील जवळपास बारा ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली व यामध्ये 126 लोक अडकले
मुरूम मंडळात अतिवृष्टी केसरजवळगा,बेळंब शिवारातील शेतकरी बांधवांची भेट घेऊन तात्काळ पंचनामे करा-शरण पाटील मुरूम ग्रामिण ता.१६,परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांचा हाताला तोंडाला आलेला घास हिरावल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबिन पिक काढून ठेवली तर शेतात मळणीसाठी ढिग शिवारात झाकून ठेवली पण माञ शेतक-यांचे सोयाबीन उभ्या पिकात पाणी असून ढिगा-या खाली पाणी गेल्याने भिजून नुकसान झाले ऊसाचे फड ही जमीन दोस्त झाले तसेच जोरदार
शंकरराव रानब्बा बिराजदार यांचे दुःखद निधन मुरूम, ता. १६ (बातमीदार) : शंकरराव रानब्बा बिराजदार, राहणार सारणी, ता.औसा यांचे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी (ता.१५) रात्री दुःखद निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. सारणी येथील एक प्रगतशील शेतकरी होते. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्यावरती शुक्रवारी (ता.१६) रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात
जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जिल्ह्यातील तलाव, बंधारे, मध्यम प्रकल्प व मोठे प्रकल्प यातील पाणीसाठा व सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी उस्मानाबाद, दि. 15(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले. भारतीय
तांडा वस्तीचे संपर्क तुटले, शेतकऱ्यांचेही नुकसान,समशान भूमीत मोठा खड्डा… मुरूम,उस्मानाबाद ता.१५, दि.१३ रोजीच्या मुसळधार पावसाने मुरूम व परिसरात आहाकार घातला, अनेक घरात पाणी घुसले तर किराणा दुकानदारसह अन्य दुकानदार व शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. मुरूम-आस्टा कासार रस्त्यावरील नदीच्या पात्रावरील पाताळे पूलाचा एक भाग पाण्यात वाहून गेल्याने पाटील तांडा,अंबर नगर,आचार्य
बंद असलेली धार्मिक स्थळे तात्काळ उघडण्यात यावीत — भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील लोहारा/प्रतिनिधी राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद या महाविकास आघाडी सरकारच्या या काळ्या निर्णयाविरुद्ध भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र
बसव प्रतिष्ठाणच्या वतीने तालुक्यातील विविध कोव्हीड सेंटरला वाफेचे मशीन भेट मुरूम ता.१३, बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने मुरूम ग्रामीण रुग्णालय अंतर्गत कोव्हीड केअर सेंटर साठी पाच, इदगाह,गुंजोटी येथील सेंटर साठी पाच तर उपजिल्हा रुग्णालय उमरगा साठी सहा वाफेचे मशीनचे भेट देण्यात आले. मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी सत्यजित डुकरे, इदगाह येथील स्वयंसेवक तथा समाजसेवक बाबा जाफरी व