राज्यातील होमगार्ड प्रश्नाबाबत ३ सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रातून निर्देश…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

राज्यातील होमगार्ड प्रश्नाबाबत ३ सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रातून निर्देश…

बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी दाखल केली होती केंद्रात तक्रार
—————————————-
होमगार्डसच्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीन सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय महासंचालकांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला दिली आहे.
—————————————-

मुरूम ता.१७, होमगार्डसच्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीन सदसीय समिती स्थापन करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय महासंचालकांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला दिली आहे. व तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल ही सादर करण्यासदेखील सांगितले आहे.

बसव प्रतिष्ठाण ने पत्राद्वारे महाराष्ट्र राज्यातील होमगार्डच्या समस्या केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवल्या होत्या. राज्यात गरज असून देखील होमगार्डना काम मिळत नाही. सरकारने पैशाची तरदूत करून देखील ते वेळेत दिली जात नाही व तसेच अनेक होमगार्ड यांना काहीही कारण दाखवून अपात्र ठरवण्यात आले आहेत, गेल्या ४-५ वर्षांपासून महासमादेशक यांनी होमगार्ड साठी कोणते चांगले निर्णय घेतलेत याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी बसव प्रतिष्ठाण ने केली होती. अनेकदा तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नसल्याचे सांगत याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी बसव प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी केली होती.


केंद्रीय गृहमंत्रालयाने आमच्या मागणीची दखल घेतली असून आता तरी होमगार्ड वरील अन्याय दूर होईल व त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, व तसेच महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयातुन होमगार्डच्या विविध मागणीचे बसव प्रतिष्ठाणचे पत्र व तसेच मंत्रिमंडळाच्या भेटीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याचे बसव प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी सांगितले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment