कंटेकूर शाळेत उन्हाळ सुट्टीतील धान्य व धान्यादी माल वाटप

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

कंटेकूर शाळेत उन्हाळ सुट्टीतील धान्य व धान्यादी माल वाटप

 

मुरुम, (प्रतिनिधी) : कंटेकूर,ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांना उन्हाळ सुट्टीतील ३४ दिवसाचे शासनाकडून काल प्राप्त झालेल्या धान्य व धान्यादी माल कोविड-१९च्या नियमांचे पालन करुन मुख्याध्यापक कमलाकर मोटे, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्लेश्वर पांचाळ, उपाध्यक्ष रुपाली बालाजी काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राम मुडगे, उपाध्यक्ष पंडीत बेंळबे, अजंली कांबळे, डिंगबर दासे,ग्रामपंचायत सदस्या अनिता स्वामी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१५) रोजी वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थी व पालकाकडून आॅनलाईन शिक्षण अभ्यासक्रमाचा आढावा घेतला व पुढील अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले. सहशिक्षक गोविंद जाधव, लक्ष्मण येवते, विठ्ठल कुलकर्णी, शिवकुमार स्वामी आदींनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पालक, शिक्षकसह विद्यार्थी कोविड-१९च्या नियमांचे पालन करुन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व धान्यादी माल वाटप व आॅनलाईन शिक्षणास मदत करत असल्याबद्दल लक्ष्मीकांत पटने यांनी सर्वांचे कौतुक व मार्गदर्शन करुन आभार मानले.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment