मुरूम येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना लिंगायत सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरूम येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना लिंगायत सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली

मुरूम ता.०३, वसुंधरारत्न,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी(दि.१) नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे.मुरूम येथे लिंगायत सेवा संघाच्या वतीने अनुभव मंटपात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे, विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणारे, अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करणारे, राष्ट्राभिमान शिकविणारे, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाडयातील पहिले एम.बी.बी.एस.डॉक्टर वयाच्या १०४ व्या वर्षापर्यंत समाजप्रबोधन केले.लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनाच नेतृत्व करत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने आध्यत्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना लिंगायत सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात अली.याप्रसंगी लिंगायत सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष देवराज संगुळगे ,बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी लिंगायत सेवा संघाचे तालुका संघटक स्वप्नील सुतार ,माजी नगरसेवक दत्तोबा गिरीबा ,नेताजी माळी, पंडित संगुळगे,भीमराव येवले, गुलाब गुंडगुळे, शिवा पांचाळ,विलास खज्जे,अजय बिराजदार, अमोल गिरीबा, आकाश क्षिरसागर,अमृत कंटेकुरे, प्रल्हाद माने,सौ.सुरेखा पांचाळ,सौ.कलावती कंटेकुरे,सौ. सुलभा वाडीकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment