शेतकऱ्यांची रखडलेली रक्कम मिळणार, तहसीलदार यांचे दिलासादायक आदेश समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी केले होते बँके विरुद्ध तक्रार दाखल

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

5
(1)

शेतकऱ्यांची रखडलेली रक्कम मिळणार, तहसीलदार यांचे दिलासादायक आदेश

समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी केले होते बँके विरुद्ध तक्रार दाखल

मुरूम ता.०२
येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकरी शेतकऱ्यांचे खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व ऑक्टोबर २०१९ चे पीक अनुदान रक्कम जमा झालेली आहे, सदरील रक्कम बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना वाटप न करता ती रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली होती.
सदरील विषयी बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी केसर जवळगा येथील १७ शेतकऱ्यांच्या व इतर अडकलेल्या रकमेसाठी तहसीलदार संजय पवार यांना दि. २७ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते.
केसर जवळगा येथील शेतकऱ्यांचे मुरूम येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खाते असून त्यांच्या खात्यावर २०१२ मध्ये कर्जही घेतलेले आहे. सदरील खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि २०१९ पीक अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले आहेत परंतु सदरील बँकचे व्यवस्थापक प्रधानमंत्री सन्मान योजना आणि २०१९ पीक अनुदान रक्कम शेतकऱ्यांना देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे, सदरील वरील योजनेचा रक्कम कर्जात जमा करून घेतले आहेत असे सांगून शेतकऱ्यांना हाकलून देत आहेत, यापूर्वीही असाच प्रकार झाला होता त्यावेळी मा.जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या पत्रानुसार कांही शेतकऱ्यांना रक्कम दिले परंतु आता परत आजच्या तारखेच्या पत्राची मागणी बँकेतून केली जात आहे. सदरील खालील शेतकऱ्यांची यादी सोबत देत आहोत.
१) हणमंत शरणप्पा जीरोळे
२) सुभाष बाबुराव ह्याम
४) अरुण भ्रमन्ना पाटील
५) पंडित अपन्ना कनमुसे
६) शिवलिंगप्पा अपन्ना कनमुसे
७) सिद्राम भीमराव भुरे
८) संगमेश्वर विश्वनाथ घाळे
९) विजयाबाई संगमेश्वर घाळे
१०) अशोक विश्वनाथ घाळे
११) शंकुतला धनंजय कोलडंगरे
१२) धनंजय मल्लिकार्जुन कोलडंगरे
१३) संजय बसनप्पा कोलडंगरे
१४) सुभाष बसनप्पा भुरे
१५) कल्पना संजय कोलडंगरे
१६) गेदप्पा हणमंत हुलगणे
१७) गुडुशा मशाक शेख
वरील शेतकरी रा.केसर जवळगा येथील असून त्यांच्या खात्यावरील जमा असलेले प्रधानमंत्री सन्मान योजना व २०१९ पीक अनुदान रक्कम शेतकऱ्यांना देण्यास बँक व्यवस्थापक टाळा टाळा करत आहेत.
मा.महोदयांनी या अर्जाची तात्काळ दखल घेऊन शेतकरी बांधवना न्याय मिळवून द्यावे व त्यांची दिवाळी गोड करावी अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली होती.
सदरील निवेदनाची तहसीलदार संजय पवार यांनी दखल घेऊन मुरूम येथील बँक ऑफ महाराष्ट्रला बँक व्यवस्थापक यांना पत्र पाठवून सदरील रक्कम वाटप करण्यास सांगण्यात आले आहे.

————————————–
याआधी ही असेच अडचण बँक व्यवस्थापक यांनी निर्माण करून शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावे लागले, आदींच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून वारंवार होणार हेळसांड थांबणे गरजेचे आहे, तहसीलदार संजय पवार यांनी दिलेले आदेश शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली.

रामलिंग पुराणे
समाजसेवक

 

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment