मुरूम शहरात गौरी सण उत्साहात साजरे…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

मुरूम शहरात गौरी सण उत्साहात साजरे…

मुरूम ता.२६, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही गौरी सण उत्स्फूर्तपणे साजरे करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सणाचे नागरिकांत उत्साह कायम होते.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही त्यापाठोपाठ आगमन झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असते.
गौरी-गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरी विसर्जन साधारणपणे तिस-या दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते. महाराष्ट्रात गौरी-गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्त्व आहे. गौरी सणासाठी अनेक पंचपकवान पदार्थांची प्रसाद,खेळणी, निरनिराळ्या भाजीपाला,फळे ईत्यादी सह गौरीच्या समोर सजावट साठी समोर मांडण्यात येते. काही ठिकाणी थांबलेली लक्ष्मी तर काही ठिकाणी तांब्यावर नारळाचे मांडणी केलेल्या लक्ष्मीच्या प्राणप्रतिष्ठापणा केल्या जातात. मुरूम शहरातील श्याम दनाने, मोहन ढगे,आनंदा बोंडगे, वेदपाठक परिवार,शेखर माळी यासह नागरिकांनी गौरी सण उत्साहात साजरे करण्यात आले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment