कोवीड-19 चाचण्यासाठी आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचना

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

कोवीड-19 चाचण्यासाठी आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचना

उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- कोवीड-19 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोवीड-19 चाचण्यासाठी साठी आयसीएमआर ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोवीड-19 चाचण्यांचे Algorithm तयार करण्यात आले आहेत. या Algorithm नुसार चाचण्या करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
1. Algorithm मध्ये कोवीड-19 चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणा-या व्यक्तीची विभागणी तीन गटामध्ये करण्यात आली आहे व प्रत्येक गटासाठीचा चाचणीचा प्रकार त्याअंतर्गत नमुद केला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे. अशांची Antigen चाचणी करण्यात यावी. यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराबाबत अर्ध्या तासात निर्णय घेता येणे शक्य होईल.
2. RTPCR चाचणी ही Antigen चाचणी नकारात्मक आलेले व लक्षणे असणारे रुग्ण, Positive व्यक्तींचे। High Risk Contact आणि परदेशांतून येणा-या व्यक्ती यांची करण्यात यावी.
3. Brought dead व्यक्ती, बाळतंपणासाठी आलेल्या माता, Emergency Operation रुग्ण इ. व्यक्तींची True nat चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी True nat सुविधा उपलब्ध नाही. अशा ठिकाणी या व्यक्तींची Antigen चाचणी करण्यात यावी.
4. मनोरुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांना प्रथम 1 आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे, त्यानंतर Antigen चाचणी करावी आणि त्यानुसार Isolation ward किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा.
5.तुरुंगाबाबत सुध्दा कैदी दाखल झाल्यानंतर 1 आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे, त्यानंतर Antigen.चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार Isolation, कोविड रुग्णालया संदर्भात करणे इ. याबाबत निर्णय घेण्यात यावा.
6. ब-याच जिल्हयांमध्ये एकाच रुग्णांच्या 2-3 चाचण्या करण्यात येतात. यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो आणि शासनाचा आर्थिक भार सुध्दा वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक व्यक्तींची Protocol नुसारच चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत.
7. प्रवास करणा-या व्यक्ती, जिल्हयात दाखल होणा-या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोवीड-19 सदृश्य लक्षणे नसल्यास कोवीड-19 चाचणी करण्यात येवू नये.उपरोक्तनुसार कार्यवाही करुन जास्तीत जास्त कोवीड-19 Positive व्यक्ती शोधल्या जातील यादृष्टीने नियोजन करावे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment