मुरूम शहरात पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ७४ रुग्ण मुरुम, ता.१७ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. सोमवारी (ता.१७) रोजी ३५ रॅपिड अँटीजन चाचणीत तिघे पॉझिटिव्ह आले.
काल दि. १६ रोजी संभाजी नगर येथील पॉजीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. सध्या विलगीकरकरण कक्षामध्ये १७ आणि १३ जणावर घरी उपचार तर एक रुग्णावर आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचार चालू असून आज एकास डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे यांनी सांगितले.
Leave A Comment