ऊस उत्पादक शेतकरी बांधवासह खरीप पिके सोयाबीन,उडीद मूग पिकाचे नुकसान भरपाई शासनाने दयावी – शरण पाटील..

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

ऊस उत्पादक शेतकरी बांधवासह खरीप पिके सोयाबीन,उडीद मूग पिकाचे नुकसान भरपाई शासनाने दयावी – शरण पाटील..

उस्मानाबाद- मागिल आठवड्यात वादळी वा-यासह पावसामुळे,जिल्हातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी.
तसेच खरीप पिके सोयाबीन,मूग,उडीद पिकांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत आज झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदे च्या सर्वसाधारण सभेत ठराव पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी केली व यासंदर्भात रीतसर ठराव शासनास आजच्या सर्वसाधारण सभेत पाठविला.
तसेच आज मंञालयात संबंधित खात्याच्या अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी केली. पाटील यांनी शाळा सुरू करण्याबातचा विषयावर चर्चा केली तर त्यावर शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शासनाचे परिपञक नसल्यामुळे 9 वी 10 वी 12 वी वर्गासाठी अद्याप तरी निर्णय नाही. असे यावेळी शिक्षण अधिकारी यांनी यावेळी सांगितले.


आदीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रस्त असलेला शेतकरी बांधव आता वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीत होरपळला आहे, जिल्ह्यातील अर्थ चक्र हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, वादळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा परिणाम दैनंदिन व्यवहारात ही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा शासनाने मावेजा देऊन भरून येणार नाही पण त्यांना जगण्यास मात्र नक्की मदत होईल. अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment