मराठवाडा मुक्ति संग्राम दिन, स्मरण एका लढवैय्या योद्ध्याचे

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन, स्मरण एका लढवैय्या योद्ध्याचे

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या या पवित्र दिवशी ज्या महान देश भक्तांनी मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत अमुल्य असे योगदान दिले आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक यातना सोसुन हा मराठवाडा जुल्मी सत्तेपासुन सोडवला. अफाट देशप्रेम अचाट ईच्छाशक्ती च्या जोरावर संघर्ष करुन या भागातील तमाम जनतेला या जोखडातुन मुक्त केले आणि एका नव्या पर्वाची सुरवात केली.या साठी ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या मातृभुमीची सेवा केली त्या तमाम ज्ञात वा अज्ञात शुरानां आज आपण मानाचा मुजरा त्याच्यां चरणी अर्पण करु या. याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावातील स्वातंत्र्य सैनिक भाई भगवानसिंग दादा याच्यां काही आठवणी नुकत्याच मुक्तीसंग्रामाच्या इतिहासात सापडल्या त्याचे स्मरण आज करणे यथोचीत ठरेल. दि. 14 आॅगष्ट 1922 रोजी याचां जन्म मुरुम येथे झाला.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन पुढील शिक्षण सोलापुर ला चालु झाले.शालेय जिवनापासुनच अन्यायाची व जुल्मी राजवटीची चीड मनात जोर धरत गेली. यातुनच थोर सेनानी स्वामी रामानंदजी तिर्थ व बाबासाहेब परांजपे याच्यां सहवासाने हा अग्नी भडकत गेला आणि संग्रामाच्या मशाली पेटू लागल्या. सोलापुरला एका जुल्मी सार्जंटचा ( इंग्रज अधिकारी )चा खात्मा वयाच्या 18 व्या वर्षी केला त्या मुळे काॅलेजचे शिक्षण संपले काॅलेजमधुन निलंबन झाले आता एका बाजुला ब्रिटिशाचां ससेमीरा व एका बाजुला निझामाचा ससेमीरा लागला त्या मुळे भुमिगत राहुन कारवाया चालु ठेवल्या. रत्नागिरी , हुबळी, धारवाड तसेच काही दिवस कारवार व गोवा येथे लपुन राहावे लागले. या काळात अनेक देशभक्ताचां सहवास व प्रेरणा मिळाली. आणि त्यातुन देशभरातील क्रांतीकारांच्या चळवळीने व त्याच्यां बलिदानाने आपला देश 15 आॅगष्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला .पण मराठवाडा मात्र यातना भोगत होता.आणि याच काळात भाई भगवानसिंग दादा भूमिगत चळवळ संपवून पुन्हा सक्रिय झाले. परत येवुन संग्रामाची आखणी होवु लागली सोबतीला अनेक लढवैय्ये सहकारी यांना बरोबर घेवुन या जुल्मी राजवटीला उलथावण्यासाठी आक्रोश होवु लागला चकमकी होवु लागल्या.
1 आॅक्टोबर 1947 ला हा संघर्ष सुरु झाला.गूलबर्गा जिल्यातील मौजे. सरसंबा ता आळंद येथील करोडगीरी नाक्याची धुळदाण
केली.तसेच केसरजवळगा येथे कॅम्प संघठन केले.या गावातील ग्रामस्थांनी खुप साह्य केले.त्याच बरोबर जामगा येथे नाक्याची प्रचंड प्रमाणात तोडफोड करुन करोडगिरी व जामगा येथील सर्व रेकाॅर्ड जाळुन टाकले. या वेळेला फार मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली तब्बल सहातास ही फायरिंग चालली त्यात अलीशेर नावाच्या सैनीकाला यमसदनास पाठवले . त्यामुळे बाकीचे सर्व शस्त्र टाकुन पळाले .हेच शस्त्र व दारुगोळा वागदरी व घोळसगाव येथील कॅम्पप्रमुखाना देण्यात आले.यातुनच सशस्त्र क्रांती सुरु झाली.जाने. 1948 ला लेव्ही प्रतिबंध व अनेक केंद्रावर हल्ला करून लुटमार केली.व 1948 मार्च अनेक रझाकार केंद्र, निझामी पोलीस पार्टी, जुल्मी रोहीले व पठाण याच्यावर सशस्त्र हल्ले करुन जेरीस आणले. तसेच अनेक पोलीस स्टेशनवर हल्ले करून रसद जमा केली.अनेक तरुणाना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले तलवार , रायफल, पिस्तुल व बाॅम्ब गोळ्याचे प्रशिक्षणदेणे हे काम स्वताः करत.अनेक रोहिले व पठाणाना व जुल्मी शासकाला यमसदनी पाठवले त्यांची मोजदाद नाही.पण एक निस्सीम देशप्रेम व राष्ट्रभावना त्या सर्वाच्या मनात होती.हे बंड फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पेटले अनेक देशभक्तानी आपले प्राण सुद्धा दिले.मुरूम गावात सुद्धा जुल्मी रोहीले व पठाणाना मारुन एक विहीर भगवानसिंग दादानी भरली अशी अख्यायिका आजही लोकात चर्चिली जाते. मूरूममध्ये अनेक स्वातंत्र्यसैनीकानी या संग्रामात काम केले आहे .या सर्व प्रवासात संसाराकडे दुर्लक्ष झाले.पण संगीत, गायन ,वादन,उत्कृष्ट शिवणकाम,पेंटीग,वाद्ये दुरुस्ती करणे असे अनेक छंद जोपासले.एका फायरिंग मध्ये डाव्याबाजुला कमरेच्याखाली बंदुकीच्या 2 गोळ्या लागल्या पण जिव वाचला.अनेक संकटाचा सामना करत धैर्याने झुंज दिली निझामशाही आता जर्जर झाली.हा जनतेचा क्षोभ पाहुन 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्त झाला. पुढे महाराष्ट्र शासन व भारत सरकार तर्फे यथोचित सन्मान झाला.( तत्कालीन प्रंतप्राधानां च्या वतीने तांब्र पदक व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला )दिं.20 जानेवारी 1989 रोजी अखेरचा श्र्वास घेतला.त्याच्यां पश्चात पत्नी चंदनबाई गहेरवार ,मुलगा किरणसिंग गहेरवार, मुली मंगल राजपुत(पुष्पा)व सौ. सुरेखा गहेरवार ठाकुर व सुन सौ. रेखा गहेरवार व नात वर्षा ,शिल्पा नातु शुभम गहेरवार आणि मुलीचे नातवंडे किशोर, अजित, संध्या , सिमा,पुजा,मंजु,स्नेहा, गजाननअसा परिवार आहे.
मुरुमच्या नागरिकानी दादांवर प्रेम केले अनेक अडचणीत मदत केली.आणि आजही त्याचं नाव जून्यापिढितले ते नव्या पिढीपर्यंत सर्व जण आदराने घेतात त्याच्यां अनेक आठवणी आभिमानाने सांगतात हाच आम्हाला मुरूमकरांचा अनमोल ठेवा आहे.त्या प्रेमातचआम्ही सदैव राहणार आहोत.
त्याच्यां बरोबर काम कारणाऱ्या सहकार्यांना व मुक्तिसंग्रामातील सर्व देशप्रेमींना मानाचा मुजरा

शब्दांकनः – किरणसिंग भगवानसिंग गहेरवार पुणे

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment