गुणवंत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

गुणवंत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

मुरूम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी) : येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी (ता. १३) रोजी महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबकराव इंगोले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजीभाऊ फुगटे, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, सहशिक्षक हणमंत शिंदे, प्राचार्य दिलीप इंगोले आदींची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रज्ञा चौधरी, पार्थ मोरे, काशीनाथ घोडके, रुपाली बेळंबे, कविता कोकरे, साक्षी पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात अकरावीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, प्राचार्य दिलीप इंगोले, हणमंत शिंदे, पुजा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रोहन हराळकर, प्रा. गोविंद इंगोले, प्रा. गणपत बेलकोणे, प्रा. बाळू इंगोले, प्रा. विनय इंगळे, प्रा. किशोर कांबळे, प्रा. साधू गायकवाड, प्रा. गजानन उपासे, प्रा. सुजित चिकुंद्रे, प्रा. प्रकाश चव्हाण, प्रा. श्रीकांत शिंदे, प्रा. वर्षा हुलगुंडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जवाहर चनशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शेषेराव राठोड तर आभार प्राध्यापिका विजया बेलकेरी यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्यांसाठी Ramling Purane Youtube Channel Subscribe करा..

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment