जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्र सुरू

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जिल्हयात नाफेड खरेदी केंद्र सुरु

उस्मनाबाद,दि.5(जिमाका):-हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी करीता केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात येत असून खरेदीसाठी नोंदणी दि. 01 ऑक्टोंबर 2020 पासुन सुरु झाली आहे.
खरेदी ही ऑन-लाईन नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची होणार असुन प्रत्यक्ष खरेदी दि. 15ऑक्टोंबर 2020 पासुन सुरु होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला सोयाबीन विक्री करावयाचा आहे त्यांनी 1.7/12 व 8 अ उतारा.2.पीक पेरा दाखला तलाठीच्या सही-शिक्यासह.3 आधारकार्डची झेरॉक्स.4.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स.5.नोंदणी साठी चालू असलेला मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह खालील नमुद खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी.
तालुका, खरेदी केंद्र, सबएजंट संस्थेचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. उस्मनाबाद- उस्मानाबाद- उस्मानाबाद- तालुका शेतकरी सह.संघलि.,उस्मानाबाद. भुम- भुम श्री.शिवाजी भुम तालुका शेतकरी सह ख.वि.संघ.भुम. वाशी-पारगांव कै.महारुद्र मोटे कृ.उ.वि.प्र.स.सं.म.गिरवली ता.भुम.तुळजापूर-नळदुर्ग श्री.खंडोबा पणन सहकारी संस्था म.अणदूर
5. लोहारा-नागुर यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादन विकास सहकारी संस्थाम.नागूर ता.लोहारा. लोहारा कानेगाव जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था म.कनेगाव उस्मानाबाद ढोकी वसुंधरा अॅग्रीकल्चर फार्मस प्रोड्युसर कं.लि.कनगरा उमरगा गुंजोटी गुंजोटी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था म.गुंजोटी तुळजापूर तुळजापूर तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ ता.तुळजापूर
कळंब कळंब एकता खरेदी विक्री सहकारी संस्था, कळंब लोहारा दस्तापूर दस्तापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी, लि.दस्तापूर कळंब शिराढोण तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ लि.,शिराढोण वाशी-वाशी-वाशी तालुका शेतकरी सह.संघ लि.,वाशी उस्मानाबाद-येडशी-तुगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.,तुगांव.
या खरेदीसाठी एफ.ए.क्यु.दर्जाच्या सोयाबीनसाठी शासनाने रुपये 3880/-प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे.असे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment