उमरगा शहरात एड्स जनजागृती महा रॅलीचे आयोजन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

उमरगा शहरात एड्स जनजागृती महा रॅलीचे आयोजन

उमरगा ता.०१, येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, आदर्श महाविद्यालय,समाज विकास संस्था, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, रोटरी क्लब उमरगा इत्यादी स्वयंसेवी संघटनाच्या वतीने एड्स कॅम्पेन च्या माध्यमातून ०१ डिसेंबर एड्स दिनानिमित्त महा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उमरगा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. अनुभले ,तहसीलदार चौघुले उमरगा पोलीस स्टेशन चे पी.आय राठोड, समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ, निखिल वाघ ,छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव,प्रा देवरकर सर प्रा सोमवंशी, प्राचार्य दिलीप गरड आदर्श महाविद्यालय उमरगा, सोनटक्के सर शिंदे सर आणि उमरगा शहरातील विविध कॉलेजचे युवा सहभागी झाले होते, या रॅलीचे उद्घाटन आणि हिरवी झेंडा दाखवून सत्र न्यायालयाचे न्यायाधीश
श्री .डी.अनुभले यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून ते स्मृती उद्यान पर्यंत आयोजन करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय,आदर्श महाविद्यालय शिवाई फार्मसी, तात्याराव मोरे फार्मसी, श्रमजीवी फार्मसी, साई ANM कॉलेज व तसेच सामाजिक प्रतिनिधी ,सर्व कॉलेज महाविद्यालय प्राध्यापक शिक्षक, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, रिक्षा युनियनचे पदाधिकारी ,शहरातील युवा वर्ग असे किमान ११०० जणांची उपस्थिती होती. सदरील रॅलीत साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले व रॅली ची सांगतां हुतात्मा स्मारक येथे HIV/AIDS विषयी शपथ देऊन करण्यात आली
कार्यक्रम आयोजनामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विनोद जाधव, संयोजक अभय भालेराव, समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते विद्या मारकड रोहित पवार दिनेश बिराजदार,कृष्णा पाटील, प्रशांत ढवळे, संकेत लवके आदींनी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment