खरच गांधीजी तुम्ही आज असते तर…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

२ ऑक्टो राष्ट्रपिता महात्मा गांधीं जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

खरच गांधीजी तुम्ही आज असते तर….
पत्रकार रामलिंग पुराणे

गांधीजी तुम्ही आज असते तर..
तुमच्या डोळ्यांनी हे स्वतंत्र भारत कसे सुजलाम सुफलाम झाले आहे पाहिले असते, तुम्ही पाहिले असते, तुम्ही नसते तर आज ही आम्ही ब्रिटिश राजवटीत गुलाम बनून राहिलो असतो *अहिंसा* नावाचा हत्यार उगारून तुम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला आणि ब्रिटिश राजवटीतून बाहेर काडुन देशातील बांधवाना ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं.अंगात धोती नावाचा एकच वस्त्र परिधान करून हातात काठी घेऊन दिला तुम्ही लढा ब्रिटिशाच्या विरोध शेवट पर्यंत *अहिंसा* ने लढत देशाला स्वातंत्र्य मिळाले पण शेवटी त्याच देशाने तुम्हाला तुमच्या कर्माचा फळ दिल आणि फक्त जिवंत ठेवले एक नाव *राष्ट्रपिता महात्मा*.
तुम्ही जर आज राहिले असते तर तुमच्या स्वप्नातील भारत तुम्ही डोळे भरून पाहिले असते, आज भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष पूर्ण झाले या ७३ वर्षात निम्या रात्रीही महिला घरी सुखरूप पोहचत आहेत तुम्ही देश स्वतंत्र करून दिल्यापासून देशातील नागरिक स्वातंत्र्याचे पुरेपूर फायदा घेत आहेत सर्वत्र खुशालीच खुशाली आहे.
गांधीजी तुम्ही आज असते तर, तुम्ही पाहिले असते देशाच्या स्वातंत्र्या साठी मैलो मैल पायी वणवा करत अंगातील रक्त गोठवून, पोटाला चिमटा मारून मिळवून दिलेलं स्वातंत्र्य सार्थक झालं. ब्रिटिश काळात लोक तुम्हाला भेटायला मैलो मैल चालत यायचे आज परिस्थती बद्दलली आहे प्रत्येक टेबलावर तुम्ही आपोआप पोहचता तुम्ही हजर तर काम झालं समजा, आज तुम्ही असते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले असते कसे तुमचे देश बांधव तुमची एकमेकांना देवाण-घेवाण करतात, तुमच्या डोळ्याचे पारणे फिटले असते…
गांधीजी तुम्ही आज राहिले असते तर पाहिले असते, या देशात लोक तुम्ही सांगितल्या प्रमाणे वाईट बघू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका हे तुमचे तीन वाक्य तर लोकांनी प्रामाणिक पणे आत्मसाथ केले आहेत, देश स्वातंत्र्य झाल्यापासून कोणी कुणाला वाईट बोलत नाहीत, वाईट ऐकत नाहीत, वाईट बघत नाहीत, मोठं मोठे राजकारणी लोक तर अत्यन्त मनापासून तुमच पूजन करतात दररोज एक मेकांना एकदम मस्त गोड गोड गप्पा गोष्टी करतात, जनतेचं काय विचारूच नका एक मेकावर एवढं प्रेम उबाळतो खरच गांधीजी तुम्ही जर आज असते तर…
तुम्ही पाहिलं असत भारत देशाचा कणा शेतकरी बांधवाना राजकारणी बांधवांनी किती सुखाने ठेवल आहे, तीन वेळा पोटभर जेवण, अंगभर वस्त्र आणि भर भरून झोप आज माझं शेतकरी बांधव घेत आहे एकदम मस्त मजेत चालू आहे, ब्रिटिशाच लगान बंद झाल्याने आज शेतकरी बांधव गळाभर सोन्यानी मंडवून अगदी थाटा माटात चार चाकी वाहनात फिरत आहे, शेतकरी बांधवाचे लेकरं एकदम मस्त मोठं मोठ्या शाळेत शिखत आहेत, आपल्या देशाला प्रगती पथावर घेऊन जायला प्रयत्न करीत आहेत, काही बांधव तर सर्व स्वप्न वेळेत पूर्ण होताच आनंदाने आत्म त्याग ही करीत आहेत खरच गांधीजी तुम्ही आज असते तर देश स्वातंत्र्य लढा सार्थ झालेल तुम्ही पाहिले असते.
खरच गांधीजी तुम्ही जर आज असते तर, तुमच्या बरोबर लढा देत फासावर गेलेली तरुणाई चा आदर्श घेऊन आजचा तरुण सर्व परीने तयार आणि सज्ज होत आहे. तुम्ही ब्रिटिशातून आम्हाला मुक्त केले आणि आता ही तरुणाई आम्हाला भ्रष्टाचार पासून मुक्त करायला प्रयत्न करीत आहे. तुम्ही अंगात वस्त्र परिधान करून पायी वणवा करत स्वातंत्र मिळवून दिलात आणि आताची तरुणाई एकदम मस्त सोसिल मेडियावर राष्ट्र हितासाठी प्रामाणिक पणे कसून प्रयत्न करीत आहेत, एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करीत आहेत खरच गांधीजी तुम्ही आज राहिले असते तर…
महिला बद्दल तर या देशात एवढ आदर्श निर्माण झालं आहे की त्याची व्याखा मला मांडता येत नाही. एवढं मात्र नक्की समजा आज माझी भगिनी देश स्वतंत्र झाल्या पासून निम्या रात्रीही न घाबरता फिरत आहे. खरच देश स्वातंत्र्य झाल गांधीजी…
खरच गांधीजी तुम्ही आज असते तर, पाहिले असते तुमच्या जन्म भूमीत एवढच काय तुम्ही कुठे भेट दिलात तिथे आज ही दारू बंद आहे, महाराष्ट्रात उरळी कांचन ला तुम्ही *निसर्ग उपचार आश्रम* तुमच्या हाथानी चालु केलात, आज ही त्या गावात दारू दुकान उघडले नाहीत, खरच गांधीजी हे सर्व संपूर्ण देशात झालं असत तर फार मोठं विकास झाल असत..
खरच गांधीजी तुम्ही आज राहिले असते तर, सर्व जनतेची मनाची शुद्धीकरण करून आज स्वच्छता मोहीम राबविणे चालु आहे अगदी गुण्या गोविंदाने लोक साफ सफाई करीत आहेत, ढिगा ढिगानी लोक कचरा गोळा करीत आहेत, संपूर्ण देश आज एकदम स्वच्छतेच्या उंबरठ्यावर आहे तुम्ही राहिले असते तर पाठ थोपटले असते *शब्बास*
ब्रिटिश काळात रेल आले, त्याची एकदम मस्त देखभाल चालु आहे, मस्त हाताळणी करीत आहेत, तुम्हाला तर एक सांगायचं विसरलोच आता तर बुलेट ट्रेन पण येतोय आणि शेतकरी बांधवाना ही मोठं मोठया चार चाखी गाड्या पण देतील..भरोसा नाही आताचे लोक काय करतील ते…
तुम्हाला रंगरंगोटी करण्याच्या नादात तर पार तुम्ही गुदमरत होता अशा ठिकाणाहून बाहेर आलो म्हणून आज देशाची एवढी प्रगती झाली आहे, भरभरून रोजगार उपलब्ध झाले आहे, कुठं कामाला जायचं हेच कळेनाशे झालं आहे पण एक मात्र चुकीच आहे मोठ्या थाटाने रंगून बाहेर आलो आणि परत गायब झालो..म्हणून मस्त स्वस्ताई चालु आहे..
मस्त सगळे आंगभरून कपडे, बूट, सॉक्स, टाय आता तुमचा ऐनक नाही बर का गॉगल आहे गॉगल..तुम्ही उच्च शिक्षण घेऊन जे राष्ट्र सेवा केलात तेच आजचे तरुणही प्रामाणिक पणे करण्याचे प्रयत्न करीत आहेत.…

खरच गांधीजी तुम्ही आज असते तर…

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment