कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह
अनुदानासाठी अर्ज करण्याची कार्यपध्दती लवकरच
उस्मानाबाद,दि,26(जिमाका):- कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल आणि याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
Leave A Comment