शरणजी पाटील यांच्या हस्ते किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी व मोमीन स्मशानभूमी व सक्करगी घर ते करोडगिरी नाका सिमेंट रस्त्याचे उदघाटन संपन्न.
मुरूम, ता.१३ (बातमीदार) : येथील किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी, मोमीन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या व तसेच सक्करगी घर ते करोडगिरी नाका सिमेंट रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. किसान चौकातून हिंदू स्मशानभूमी कडे जाणारा व मोमीन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करावा अशी मागणी तेथील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली होती. कारण पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे पक्या रस्त्यात रूपांतर होणे गरजेचे होते. यावेळी नगरसेवक रशीद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी शरण पाटील म्हणाले की, शहराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य चालू आहे. नगराध्यक्षा अनिता अंबर, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड हे नेहमी शहराचा विकास करण्याचे काम करीत असून विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून विकास झालाच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.सदरील रस्ते कामे नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण ठोक योजने अंतर्गत होत असल्याची माहिती नगरसेवक रशीद शेेेख यांनी सांगितले
नगराध्यक्षा अनिता अंबर यांच्या घरी पार पडलेल्या उदघाटन सोहळा समारोप प्रसंगी शरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिता अंबर, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा, श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, नगरसेवक शंभुलिंग पाटील, सिद्धलिंग स्वामी, रशीद गुत्तेदार, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, डॉ. रवींद्र गायकवाड, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, सुरेश शेळके, भगवान जाधव, अरविंद माळी, अशोक जाधव, व्यंकट चौधरी, रमेश जाधव, नईम डफेदार, अरविंद बेंडकाळे, बाळू भालकाटे, सुभाष खंडागळे, श्रीहरी शिंदे, राजू मुल्ला,चांद मुल्ला, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर,किरण गायकवाड, देवराज संगुळगे आदींची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर तर आभार राहुल वाघ यांनी मानले.
सदरील हिंदू समशान भूमी रस्ता व्हावे यासाठी माऊली ट्रस्ट मुरूम च्या वतीने अरविंद बेंडकाळे, बाळासाहेब भालकाटे व शिवाजी सावंत यांनी नगर परिषदेकडे निवेदन देऊन मागणी केली होती.
Leave A Comment