शहरात मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दीन साजरा..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

शहरात मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दीन साजरा..

मुरूम ता.०६, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील योगेश जगताप, प्रा. दत्ता इंगळे, भीमराव फुगटे, प्रा. डॉ. दत्तात्रय मुरुमकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रतिमेस पुष्पहार घालून महापुरुषांच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आस्मानी सुलतानी संकटांना पेलून बारा आघाड्यावर लढत बलाढ्य अशा मोगलाईला मातीमोल करून सर्वसामान्य पिचलेल्या उपेक्षितांना सोबत घेऊन भूमिपुत्रांच्या हक्काचे साम्राज्य उभे करुन धर्माच्या नावावर अनेकांना भीती घालणाऱ्या वैदिक व्यवस्थेला धक्का देऊन सकल मराठीजणांचे स्वराज्य उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या देखरेखीखाली व शिवपुत्र शंभूराजांच्या नियोजनबद्धतेने संपन्न झाला, तो अशा राजाचा राज्याभिषेक आजही उत्साहात साजरा केला जातो हे गौरवास्पद आहे, असे मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. दत्तात्रय मुरूमकर सर यांनी व्यक्त केले. प्रा. दत्ता इंगळे सर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकपर भूमिका किरण गायकवाड यांनी मांडली तर सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले.
यावेळी विठ्ठल पाटील, संजय सावंत, गणेश जाधव, विष्णु चव्हाण, किशोर गायकवाड, आनंद कांबळे, सचिन शिंदे, भालचंद्र शिंदे, विशाल व्हणाळे, महेश शिंदे, प्रल्हाद माने, गणेश शिंदे, संभाजी शिंदे, अक्षय शिंदे, आबा शिंदे, वैभव शिंदे, विकी शिंदे, सागर धुमुरे, बंडू ब्याळे, विशाल जगदाळे, रतन मुडे, प्रशांत शिंदे, अमर भालेराव, दिनेश माने, प्रवीण चौधरी यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment