महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत निवेदन
मुरूम ता.२१, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन भरपाई मिळणे बाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज तुळजापूर येथील भेटी दरम्यान निवेदन देण्यात आले.
राज्यातील काही भागात संततधार मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्यामध्येच सोयाबीन आहे. तर कांहीनी सोयाबीन ची कापनी केल्यानंतर वावरातच ठेवले असल्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओड्या, नदि काठच्या अनेक गावातील सोयाबीन वाहून गेले आहे. तसेच शेतातील, ऊस, बाजरी, सोयाबीन, मका, कपासी, सुर्यफुल, कांदे, तसेच फळभाज्यांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज पडल्यामुळे पशुधनास मुकावे लागले आहे. कालपासुन सर्व भागात वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसामुळे रस्ते, रस्त्यावरील पुल, उखडले असून दळणवळणाला अडचण येत आहे. तसेच बहूतांश तालूक्यामध्ये पाझर लाव, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. नॅशनल हायवे नजीकच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जावून शेतीमाल, शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी अतिवृष्टी भागातील सर्व जिल्हयामध्ये झालेल्या नुकसानिचा आढावा घेऊन त्वरित आर्थिक मदत देणे बाबत आदेश व्हावेत.
प्रमुख मागणी
1. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रु. मदत देण्यात यावी.
2. अतिवृष्टी मृत पावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत
करणे.
3. फळबागासाठी वेगळे पॅकेज देण्यात यावे.
4. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे.
5. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे.
6. पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यात यावे.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,आ.अमर राजुरकर,आ.धीरज देशमुख,सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळ्ळोलगी,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील,उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,डीसी बँक संचालक सुनिल चव्हाण उस्मानाबाद शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे,लातुर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे,प्रदेश सचिव अमर खानापुरे जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव,सभापती सचिन पाटील,सेवादल विलास शाळु,माजी सभापती रणजित पाटील,राहुल लोखंडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
Leave A Comment