उद्या गणेशाचे आगमन, कोरोनाचे सावट गणेश उत्सवा वरही, कुंभारांच्या व्यवसाया वरही परिणाम

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जनता कर्फ्यू शिथिल, नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी केले कामाचा श्री गणेशा..
उद्या गणेशाचे आगमन, कोरोनाचे सावट गणेश उत्सवा वरही..
कुंभारांच्या व्यवसाया वरही परिणाम
नागरिकांत उत्साह मात्र शासनाचे नियमाचे पालन ही गरजेचे
मुरूम, ता. २१ दर शनिवारी असणारे जनता कर्फ्यू उद्या दि. २२ व २९ रोजी गणेश उत्सवानिमित्त जनता कर्फु शिथिल करण्यात आले असल्याने नागरिकांना दिलासा देणारे आदेश पारित करून नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपल्या कामाचा श्री गणेशा केले.

दि. २२ पासून चालू होणाऱ्या गणेश उत्सवाला आज बाजारात गणेशच्या मूर्ती विक्रीस आल्यास, जर वर्षी भरभरून दिसणारे बाजर पेठा यावर्षी कोरोनोचा परिणाम झाल्याचे दिसून आले. दर वर्षी मुरूम शहरातील गणेश मूर्ती घडवणारे कुंभार हजार पोत्याचे गणेश मूर्ती बनवत यावर्षी मात्र दोनशे पोत्याचेच मूर्ती बनवले असल्याचे कुंभाराणी सांगितले.
मुरूम शहरातील गणेश मूर्ती विक्री साठी असणारे मुख्य बाजार पेठ म्हणजे अशोक चौक या चौकातील आजची परिस्थिती एकदम शुकशुकाट होती, दरवर्षी या चौकात गणेश मूर्ती खरेदी साठी बच्चे कंपनी, मोठे गणेश मंडळ वाजत गाजत मूर्तीचे पूजन करून गणेशाची आगमनाची स्वागत करून मूर्ती घेऊन जात यावर्षी मात्र कोरोनाचे सावट या सनावरही दिसून आले, बाजरात दरवर्षी जे रौनक असायचे ते यावर्षी दिसत नव्हते.
तसेच गणेशाचे आगमनाचे उत्साह तर आहेच पण शासनाचे नियमाचेही पालन करणे गरजेचे असल्याचे नागरिक प्रमोद आबा कुलकर्णी यांनी सांगितले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment