माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण
मुरूम, (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, उस्मानाबाद व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (ता.२६) रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी २६ ११ हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांनी संविधानाच्या उद्येशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी डॉ.सायबण्णा घोडके यांनी संविधानाचे महत्त्व याविषयावार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नागनाथ बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.रविंद्र आळंगे तर आभार डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी महाअंनिसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.राम बजगिरे, डॉ.विनायक रासुरे, डॉ.मुकूंद धुळेकर, डॉ.शिवपुत्र कनाडे, डॉ.महादेव कलशेट्टी, प्रा.सुजित मटकरी, डॉ.रविंद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Leave A Comment