प्रा.डॉ.महेश मोटे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

प्रा.डॉ.महेश मोटे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान..

मुरुम, ता.६ (प्रतिनिधी) : वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन, अमेरिका आयोजित वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड-२०२० वितरण सोहळा नुकताच श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नाशिक म्हाडा विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्ल प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, मीडल, मेंबरशिप सन्मानपत्र, संविधान ग्रंथ देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधाताई गोविंदराव आदिक होत्या. यावेळी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ.खंडू माळवे, वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल असोसिएशन महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे आदींच्या प्रमुख उपस्थितीत अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या त्यांच्या योगदानाबद्ल औसाचे माजी आमदार बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ.किरण राजपूत, प्रा.दिनकर बिराजदार, डॉ.शिवपुत्र कनाडे, डॉ.विनायक रासुरे, डॉ.सुभाष हुलपल्ले, डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा.प्रतापसिंग राजपूत, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.सुजित मटकरी, डॉ.महादेव कलशेट्टी आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment