निधन वार्ता संजय बोंगरगे यांचे निधन मुरूम, ता. २२ (बातमीदार) : येथील यशवंत नगर भागात राहणारे कै.संजय हणमंतप्पा बोंगरगे यांचे शनिवारी (ता.२२) रोजी दुपारी अल्पशा आजाराने उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून या परिसरात एक उपक्रमशील व्यक्तिमत्व अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. मनमिळाऊ स्वभाव, अभ्यासू व्यक्तिमत्व, मोठा मित्र परिवार,
बसवेश्वर युवक मंडळाकडून रक्तदान शिबिर ८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. रक्तदात्यांना वाफेची मशिन भेट मुरूम, ता.१४ (प्रतिनिधी) : येथील बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती व रमजान ईद निमित्त रक्तदान शिबिर शुक्रवारी (ता.१४) रोजी घेऊन सामुदायिक जयंती साजरी करण्यात आली. सध्या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या
तालुका काँग्रेस समितीच्या वतीने दररोज सातशे जणांना अन्नदान मुरूम: काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून बाधित रुग्ण व नातेवाईकांना मिळतोय आधार तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान वेळी शरण पाटील, दिलीप भालेराव, महेश माशाळकर आदी मुरूम ता.१२ : कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांची लॉकडाउनमुळे जेवणाची अडचण होत असल्याने काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील
दत्तात्र्य कारभारी यांचे निधन मुरुम, ता. १० (प्रतिनिधी) : कलदेव लिंबाळा, ता.उमरगा येथील दत्तात्र्य परमेश्वर कारभारी यांचे लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (ता.१०) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुःखद निधन झाले. हे ६३ वर्षाचे होते. निधनाची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. ते मुरूमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, गेल्या १५
लसीकरणास पहिली नोंदणी, पहिले लसीकरण कार्यपद्धती राबवण्याचे मागणी पुराणे यांचे प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे मागणी मुरूम ता.१०, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लसीकरण चालू आहे, सद्या सर्वत्र लसीचा तुटवडा असल्यामुळे पहिले डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना अद्याप दुसरे डोस मिळाले नाही, तरी पहिल्यांदा पहिले डोस घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करूनच, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करावी. सद्या चालू असलेल्या लसीकरण नोंदणीत, नोंदणी तर होत
कोव्हिड सेंटर येथे अजित चौधरी यांच्या हस्ते मास्क सॅनिटायजरचे वाटप.. मुरूम येथील कोविड सेंटर मधील आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा जबाबदारीने व काळजीने उपचार करत आहेत त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने ऋण व्यक्त करण्यासाठी आज सत्कार करून आभार मानले कोरोना सारख्या कठीण परिस्थितीच्या काळात जिवाची पर्वा न करता , रूग्णाची काळजी करत आहेत तसेच रूग्णांना मानसिक आधार देउन कोरोना
मुरूम ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची व्यवस्था चालू करण्याची समाजसेवक रामलिंग पुराणे यांची मागणी मुरूम ता.३०, मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात २० ते २५ ऑक्सिजन बेड वापरण्यायोग्य तयार आहेत, परंतु मुरूम ग्रामीण रुग्णालयासाठी राखीव असलेले १० जम्बो सिलेंडर पैकी ५ सिलेंडर तुळजापूर रुग्णालयास तर २ जम्बो सिलेंडर उमरगा उपजिल्हा रुग्णालयास पाठवण्यात आले असून शिल्लक तीन सिलेंडर मुरूम येथे आहेत. मुरूम शहराच्या परिसरातील
राज्यात रक्ताचा तुटवडा, मुरूम काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. मुरूम ता.०१ मे (प्रतिनिधी) : सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पावधीत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार असल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने तरी रक्तदान करता येणार नसल्याने. सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई
कोव्हिड केअर सेंटरवरील कंत्राटी कामगारांचे रेड अलर्ट आंदोलन.. मुरूम ता. २७, कोव्हिडच्या काळात पहिल्या लाटेपासून अविरत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्तपदावर सेवेत कायम करावे अशी मागणी करत मुरूम येथील कोव्हिड केअर सेंटर येथे कंत्राटी कामगारांनी हाताला लाल रिबीन बांधून रेड अलर्ट आंदोलन केले. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यासाठी रेड अलर्ट आंदोलन पुकारले आहे. दि. २६ ते २९ एप्रिल दरम्यान हाताला लाल