विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे विद्वान बनावं… धम्मचारी धम्मभुषण मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी): शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखं विद्वान बनावं असं प्रतिपादन धम्मचारी धम्मभुषण यांनी केले. त्रिरत्न बौद्ध महासंघ शाखा मुरुम व
शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – बसवराज पाटील मुरुम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : साखर उद्योग हा पूर्णपणे शेती व निसर्गावर अवलंबून आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी चालविणे व ती टिकविणे सध्या मोठे आव्हान आहे. ज्या हेतूने सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन
आमदार चौगुले यांच्या बदललेल्या वागणुकीमुळे भाजपात प्रवेश- चंद्रशेखर मूदकण्णा-पाटील, माजी उपतालुका प्रमुख शिवसेना मुरूम ता.०४, येथील माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मूदकण्णा पाटील यांनी दि.०३ रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा व्यापारी आघाडीचे श्रीकांत उर्फ राजू मिनियार, अनदूरचे दीपक आलूरे, सास्तुरचे राहुल पाटील सह शेकडो कार्यकर्त्या सह तुळजापूर येथे
शैक्षणिक संस्था या एखादया कुटुंबासारख्या असतात- बसवराज पाटील मुरूम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) : संस्थेतील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊ शकतात परंतु त्यांनी कामाच्या माध्यमातून जी प्रतिमा तयार केली आहे. त्यातून ते कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत. जी माणसे चांगला विचार करून सेवाभावीवृत्तीने कार्य करतात आणि सतत कार्यमग्न राहतात. त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना निश्चितच आदर्शवत राहू शकते. माणसांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत — (जनसंपर्क कक्ष-मुख्यमंत्री सचिवालय) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय —— जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई, दि. २९- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा
अभ्यास मंडळे व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे…. प्राचार्य डॉ.अशोक सपाटे मुरूम, ता. उमरगा, ता.२७ (प्रतिनिधी): सध्या देशात विविध क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्ती दवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी चांगले विचार कृतीमध्ये आणण्यासाठी नियमित विविध उपक्रमामध्ये सक्रिय राहून स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास साधण्यासाठी अभ्यास मंडळे ही व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन
उमरगा जनता सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साजरी मुरूम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : उमरगा जनता बँकेने सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करुन २०६ कोटी ठेवी तर २३१ कोटीचे खेळते भाग भांडवल आहे. सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. रिझर्व्ह बँकेचे नियम वरचेवर बदलत असून अनेक निर्बंध लावले जात आहेत. स्पर्धेच्या युगात कसोटीचा काळ आहे.
तृतीयपंथीसाठी कायदे व आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न…. उमरगा ता.२३, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, उमानाबाद ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद व एकता बहुउद्देशीय महीला मंडळ लातूर आणि उपजिल्हा रुग्णालय आयसिटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या सेवा पंधरवाडा अभिमान अंतर्गत दि. २३ सप्टेंबर रोजी उमरगा येथे उमरगा तालुक्यातील तृतीय पंथीना आरोग्य विषयी,
श्रेया बिराजदार हिचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार मुरूम, ता. उमरगा, ता. २४ (प्रतिनिधी) : येथील व शाहू महाविद्यालयातून १२ वी विज्ञान शाखेतील कुमारी श्रेया दिनकर बिराजदार हिने नुकत्याच पार पडलेल्या वैद्यकीय चाचणी परीक्षेत ६४२ गुण घेऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते शाल, बुके देवून तिचा शुक्रवारी (ता. २३) रोजी
पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाचा गौरव…. मुरूम ता.२२, गणेशोत्सवा निमित्त विविध सामाजिक,सांस्कृतिक, देखावे सादर करत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाना मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मुरूम पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप, सह्ययक पोलीस निरीक्षक पी पी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ रोजी चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुरूम शहर,